Mumbai City team players in practice before the semi-final match Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: मुंबई सिटीसमोर बंगळूरला रोखण्याचे आव्हान

स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पहिला टप्पा आजपासून

किशोर पेटकर

ISL Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लीग शिल्ड जिंकलेला मुंबई सिटी संघ करंडक जिंकण्यास इच्छुक आहे, पण त्यापूर्वी त्यांना सलग नऊ सामने जिंकलेल्या बंगळूर एफसीचा धडाका रोखावा लागेल.

स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पहिला टप्पा मंगळवारपासून (ता. 7) खेळला जाईल. मुंबई येथे घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेण्याची मुंबई सिटीला संधी असेल. साखळी फेरीत अव्वल स्थान मिळवत डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने थेट उपांत्य फेरी गाठली.

बंगळूरने वादग्रस्त ठरलेल्या प्ले-ऑफ नॉकआऊट लढतीत केरळा ब्लास्टर्सला हरवून उपांत्य फेरीत जागा मिळविली. अतिरिक्त वेळेत बंगळूरच्या सुनील छेत्री थेट फ्रीकिकवर गोल केल्यानंतर तो गोल नियमानुसार नसल्याचे कारण देत केरळा ब्लास्टर्सने सामना अर्धवट सोडला होता.

मुंबई सिटीला बंगळूरकडूनच धक्का

मुंबई सिटी संघ आयएसएल साखळी फेरीत सलग 18 सामने अपराजित राहिला, पण त्यांची ही मालिका बंगळूरनेच खंडित केली होती. त्यानंतर अखेरच्या साखळी लढतीत मुंबई सिटीला ईस्ट बंगालनेही नमविले. त्या लढतीत प्रशिक्षक बकिंगहॅम यांनी राखीव फळीतील खेळाडूंना संधी दिली होती.

मात्र मंगळवारी ते सर्वोत्तम संघ मैदानात उतरविणार आहेत हे नक्की. ‘‘दोन टप्प्यातील उपांत्य फेरीकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असून पूर्ण नव्वद मिनिटांच्या रणनीतीसह आम्ही मैदानात उतरू,’’ असे सामन्याच्या पूर्वसंध्येला बकिंगहॅम यांनी सांगितले.

खेळाडूंना सावरण्यासाठी दोन आठवड्यांच्या कालावधी मिळाला असून सर्व खेळाडू तंदुरुस्त असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बंगळूरने नोंदविले सलग विजय

आयएसएल स्पर्धेत बंगळूची सुरवात खराब झाली. त्या कालावधीत त्यांना पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीकडून 4-0 असा पराभव पत्करावा लागला होता.

मात्र त्यानंतर सायमन ग्रेसन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने मुसंडी मारली. या संघाने सहा जानेवारीपासून सलग नऊ लढती जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.

‘‘मुंबई सिटीची अपराजित मालिका आम्ही सर्वप्रथम खंडित केली, त्यामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास बळावला आहे. मात्र मागील लढतींना आता महत्त्व नाही. उपांत्य फेरीतील दोन टप्प्यातील सामन्यांतील दडपण हाताळणे निर्णायक असेल. चांगला खेळ करावाच लागेल, त्याचवेळी नशिबाचाही थोडी साथ हवी,’’ असे ग्रेसन यांनी नमूद केले.

एकमेकांविरुद्ध मैदानात...

- आयएसएलमध्ये एकूण 12 लढती

- मुंबई सिटीचे 6, बंगळूरचे 5 विजय, 1 सामना बरोबरीत

- यंदा साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यात मुंबई सिटी 4-0, तर दुसऱ्या टप्प्यात बंगळूर 2-1 फरकाने विजयी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT