Margao Municipality : मडगाव नगरपालिका आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात! कर्मचार्‍यांचा पगार लांबणीवर

नगरपालिकेच्या मालकीची जवळपास 500 दुकाने आहेत; परंतु धक्कादायक बाब म्हणजे केवळ 15 दुकानांकडेच व्यापार परवाने आहेत.
Goa | Margao Municipality
Goa | Margao MunicipalityDainik Gomantak

Madgaon Municipality: मडगाव नगरपालिका सध्या आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मडगाव नगरपालिकेची अवस्था अतिशय बिकट असून पालिका कर्मचार्‍यांना पगार देऊ शकत नाही.

मडगावचे आमदार व नगरसेवक हे मुख्य थकबाकीदार आहेत. त्यांनी सणासुदीत लोकांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत ज्याचा आजपर्यंत त्यांनी कर भरलेला नाही.

Goa | Margao Municipality
Vishwajit Rane : टॅंकर माफियांवर वरदहस्त अभियंत्यांचा; सरकारने माफियांची चौकशी करावी

नगरपालिकेच्या मालकीची जवळपास 500 दुकाने आहेत; परंतु धक्कादायक बाब म्हणजे केवळ 15 दुकानांकडेच व्यापार परवाने आहेत. मडगाव नगरपालिकेने महसूल गोळा करण्यावर भर दिला पाहिजे, लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे साविओ कुथिनो म्हणाले. साविओ यांनी मडगावच्या आमदारांनाही कर वसुलीसाठी विशेष अध्यादेश आणण्याची विनंती केली आहे.

यावर घनश्याम शिरोडकर म्हणाले की, मडगाव नगरपालिकेला उत्पन्न मिळू न शकणे हे संपूर्ण अपयश आहे. पगार देण्यासाठी सरकारी निधीची गरज नाही. नगरपालिकेने नियोजन करून निधी गोळा केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com