माजी भारतीय क्रिकेट संघ आणि माजी महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांनी अॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या पराभवासाठी इंडियन प्रीमियर लीगला जबाबदार धरणाऱ्या क्रिकेट पंडित आणि इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंवर टीका केली. इंग्लंडविरुद्धच्या (England) अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडचा 4-0 असा धुव्वा उडवला.
संपूर्ण मालिकेत इंग्लंडचा संघ कधीही ऑस्ट्रेलियाशी टक्कर देऊ शकला नाही आणि त्यांना वाईटरित्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड गोवरने यासाठी आयपीएलला जबाबदार धरले. आयपीएलवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर रमण (WV Raman) यांनी ट्विट करत इंडियन लीगकडे बोट दाखविणाऱ्यांवर ताशेरे ओढले.
दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये त्यांनी इंग्लंड संघाच्या कामगिरीला सुमार म्हटले आहे. त्यांनी पुढे लिहिले, "अॅशेस मालिकेत (Ashes Series) इंग्लंडची कामगिरी योग्य राहीली नाही. त्यांच्या माजी कर्णधारांच्या मते, याचे कारण आयपीएल आहे. त्यामुळे द हंड्रेड त्यांना डब्ल्यूटीसी फायनल्स जिंकण्यास मदत करेल असे मानू या. फक्त काही लोक आयपीएलबद्दल विचार करत असून त्यांना त्यात अडचण आहे.
प्रत्येकजण स्वतःचा निर्णय घेईल
रमण पुढे म्हणाले की, प्रत्येक खेळाडू त्याच्यासाठी जे सर्वोत्तम असेल ते करेल. त्यांनी पुढे लिहिले, “जर त्यांची मुख्य चिंता असेल की आयपीएलमध्ये खेळल्याने कामगिरी खराब होते आणि संयम, क्षमता कमी होते, तर आम्ही त्याबद्दल काहीही करु शकत नाही. जेव्हा आयपीएलमध्ये खेळाडू निवडण्याची संधी असते, तेव्हा प्रत्येक खेळाडू त्याच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते निवडत असतो.
डेव्हिड गवर यांनी ही माहिती दिली
अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 146 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर डेव्हिड बीटी स्पोर्टशी बोलताना म्हणाला, "जो रुट उपलब्ध नसलेल्यांसोबत उभा आहे, मग ते कुठे आहेत? आयपीएल मध्ये. इंग्लंड क्रिकेटसाठी हे किती चांगले आहे? हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि महत्त्वाचा फॉरमॅट आहे. आपण ते जतन केले पाहिजे."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.