Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: विराटच्या 100 व्या कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी, चाहत्यांपुढे झुकले BCCI

भारतीय क्रिकेट संघ आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांच्या दबावापुढे अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नमते घ्यावे लागले आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडिया (Team India) आणि विराट कोहलीच्या चाहत्यांच्या दबावापुढे अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नमते घ्यावे लागले आहे. मोहालीमध्ये होणाऱ्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय मंडळाने (BCCI) 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. जो भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. तत्पूर्वी, बोर्डाने या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली नव्हती. ज्यासाठी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पंजाब निवडणुकीची मतमोजणी हे कारण देण्यात आले होते. त्याच वेळी, याआधी धर्मशालामध्ये झालेल्या टी-20 आणि त्यानंतर बंगळुरुमध्ये (Bangalore) होणार्‍या दुसर्‍या कसोटीसाठी प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. (The BCCI Has Allowed Spectators For Virat Kohlis 100th Test)

दरम्यान, एएनआयने बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांच्या हवाल्याने सांगितले की, या कसोटी सामन्यांसाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांना उपस्थित राहू देण्याचे मान्य केले आहे.

शाह म्हणाले, “मोहालीमध्ये पंजाब क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी प्रेक्षकांच्या अनुपस्थित होणार होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत अनेक बाबींवर अवलंबून असलेल्या प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे. दरम्यान, मी पीसीए अधिकार्‍यांशी बोललो आहे. त्यावेळी त्यांनी पुष्टी केली आहे की, चाहते कोहलीच्या 100 व्या कसोटी सामन्यातील ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार होऊ शकतील.

बीसीसीआयच्या निर्णयावरुन गदारोळ झाला होता

यापूर्वी, रविवारी 27 फेब्रुवारी रोजी पंजाब क्रिकेट असोसिएशनने मोहाली कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पीसीएने सांगितले होते की, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भारतीय बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. मात्र, याशिवाय बेंगळुरुमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टसाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत चाहत्यांनी ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोर्डाच्या या निर्णयावर कडाडून टीका केली होती. विशेष म्हणजे बोर्डाला हा निर्णय बदलण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी बोर्डाने दिली आहे.

100 वी कसोटी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार अर्थात 4 मार्चपासून मोहालीमध्ये खेळविण्यात येणार आहे. यासह विराट कोहली 100 वा कसोटी सामने खेळणारा 12 वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. एवढंच नाही तर हा पराक्रम करणारा तो जगातील 71वा खेळाडू असणार आहे. अशा परिस्थितीत 100 कसोटी सामने खेळणारा 71 वा खेळाडू बनण्याबरोबरच कोहलीला आपल्या 71 व्या शतकाची प्रतीक्षाही संपवायची आहे. त्यामुळे हा कसोटी संस्मरणीय ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT