IND vs SL: युजवेंद्र चहल श्रीलंकेविरुद्ध करणार नवा विक्रम!

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये अलीकडेच जसप्रीत बुमराहला मागे टाकत युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalDainik Gomantak
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये अलीकडेच जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) मागे टाकत युजवेंद्र चहलने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला. चहलने आता आणखी काही विक्रम आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर आहे. भारत आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसरा सामना शनिवारी होणार आहे. लखनऊमध्ये (Lucknow) झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील दुसरा सामना धर्मशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तर मालिकेतील तिसरा सामनाही याच मैदानावर होणार आहे. या दोन सामन्यांमध्ये चहल आणखी काही नव्या विक्रमांना गवसणी घालू शकतो. (If Yuzvendra Chahal Takes Four More Wickets He Will Become The Fourth Indian Player)

दरम्यान, पहिल्या सामन्यात चहलने एक विकेट घेतली होती. आता त्याने आणखी चार विकेट घेतल्यास तो T20 मध्ये त्याच्या एकूण 250 बळींचा टप्पा पूर्ण करेल. विशेष म्हणजे असे करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरणार आहे. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम पियुष चावलाच्या (Piyush Chawla) नावावर आहे. पियुषने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 270 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) नावावर 264 विकेट्स आहेत. तर अमित मिश्रा 262 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. चहलच्या नावावर 246 विकेट्स आहेत.

Yuzvendra Chahal
IND vs SL: टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' खेळाडू मालिकेतून आउट

तसेच, चहल श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्यापासून फक्त सहा विकेट्स दूर आहे. या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पा पहिल्या क्रमांकावर आहे. झाम्पाच्या नावावर 21 विकेट्स आहेत.

याशिवाय, हा विक्रम करण्यासाठी चहलकडे सध्याच्या मालिकेतील दोन सामने आहेत. शनिवारनंतर रविवारी या मैदानावर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com