Team India  Dainik Gomantak
क्रीडा

INDvsENG: ECB ने पाचव्या कसोटीच्या वेळेत केला बदल, आता यावेळी सुरू होणार सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून होणारा कसोटी सामना आता स्थानिक वेळेनुसार सुरू होईल.

दैनिक गोमन्तक

India vs England: भारतीय संघ 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एजबॅस्टन कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना आहे. मात्र आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या सामन्याची वेळ बदलली आहे. आता हा सामना नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी सुरू होईल. (IND vs ENG Start Timing Rescheduled)

डेलीमेलच्या वृत्तानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून होणारा कसोटी सामना आता स्थानिक वेळेनुसार 10.30 वाजता सुरू होईल. इंग्लंडमध्ये कसोटी सामने सहसा सकाळी 11 वाजता सुरू होतात. भारतीय वेळेनुसार पाहिल्यास हा सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अडीच वाजता होईल. तत्पूर्वी हा कसोटी सामना भारताच्या वेळेनुसार 3.30 वाजता सुरू होणार होता, तर नाणेफेक 3 वाजता होणार होती.

मालिकेत भारत2-1 ने पुढे

भारतीय चाहत्यांची सोय लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजता सुरू होणारा कसोटी सामना स्टंप टाइम रात्री 10 वाजता असेल. अशा स्थितीत भारतीय चाहते संपूर्ण सामना सहज पाहू शकतात. दुसरीकडे, भारतातील कसोटी सामने सकाळी 9:30 वाजता सुरू होतात आणि संध्याकाळी 5 वाजता स्टंप होतात. मात्र, इंग्लंडमध्ये ही वेळ रात्री 11 ते 6 अशी असते. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chikhalim Bike Fire: सिग्नलला थांबलेल्या दुचाकीने अचानक घेतला पेट! दाबोळी - चिखली मार्गावर आगीचा थरार; दुचाकीस्वार बचावला

Goa ZP Election: 'सध्या लढा आहे तो भाजप विरुद्ध गोवा असा'! LOP युरींचे मत; काँग्रेस, आरजीपी, फॉरवर्ड निवडणूकीसाठी एकत्र

Rama Kankonkar: काणकोणकर हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार 'जेनिटो'च! ऑनलाइन खिल्लीमुळे सुडाची सुपारी; 8 आरोपींविरुद्ध चार्जशीट

Pooja Naik: पूजा नाईकचा 'मोबाईल' तपासासाठी ‘फॉरेन्‍सिक’ कडे! पुराव्‍यांबाबत उत्‍कंठा वाढली; 'नार्को'विषयी मुख्यमंत्र्यांनी टाळले उत्तर

Horoscope: अडकलेली कामे पूर्ण होतील, प्रेमसंबंधात संवाद वाढेल; 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ बातमीची शक्यता

SCROLL FOR NEXT