67 वर्षांचा दुष्काळ संपवत मध्य प्रदेशने रणजी ट्रॉफीवर कोरले नाव...

मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडक जिंकला आहे. तब्बल 67 वर्षांनंतर संघ चॅम्पियन बनण्यात यशस्वी झाला
Madhya Pradesh has won Ranji Trophy
Madhya Pradesh has won Ranji Trophy Dainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेशने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर इतिहास रचला. 2022 च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा 6 गडी राखून पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. मध्य प्रदेशचा संघ 1954-55 पासून रणजी ट्रॉफी खेळत आहे. अशा परिस्थितीत 67 वर्षांचा दुष्काळ संपवत त्यांनी रणजी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. (Madhya Pradesh vs Mumbai Final)

Madhya Pradesh has won Ranji Trophy
श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे मानले आभार

अंतिम सामन्यात मुंबईने प्रथम खेळून 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने रजत पाटीदार 122, यश दुबे 133 आणि शुभम शर्माच्या 116 धावांच्या जोरावर 536 धावा केल्या आणि 162 धावांची मोठी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात मुंबईचा संघ 269 धावांत गारद झाला. अशा प्रकारे मध्य प्रदेशला 108 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी चार विकेट गमावून पूर्ण केले.

Madhya Pradesh has won Ranji Trophy
प्रेक्षकांनी पंतला ऑटोग्राफऐवजी सेल्फी घेण्यास सांगितले तेव्हा...

मध्य प्रदेशसाठी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या रजत पाटीदारने दुसऱ्या डावातही आश्चर्यकारक कामगिरी केली. रजतने दुसऱ्या डावात 29 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आले. याशिवाय दुसऱ्या डावात हिमांशू मंत्रीने 37 आणि शुभम शर्माने 30 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com