तेजस्विनी  Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या विजयात तेजस्विनीची बाजी

विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Batting) स्वीकारली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: तेजस्विनी दुर्गड हिचे धडाकेबाज अर्धशतक, तसेच सलामीची श्रेया परब आणि कर्णधार शिखा पांडे यांच्या प्रभावी फलंदाजीच्या बळावर रविवारी गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने दणदणीत विजय सलामी दिली. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील एलिट ड गट लढतीत त्यांनी विदर्भास सात विकेट आणि अकरा चेंडू राखून सहज हरविले. सामना विशाखापट्टणम येथील कंडुकुरी क्रिकेट अकादमी मैदानावर झाला.

धावबाद होण्यापूर्वी तेजस्विनीने 74 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. संघाला(team) विजयाच्या दिशेने नेताना तेजस्विनीने श्रेया परब हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची, तर नंतर शिखा हिच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. विजयासाठी 17 धावा हव्या असताना तेजस्विनी बाद झाली. नंतर शिखाने संजुला नाईकसमवेत विजयी औपचारिकता पूर्ण केली. संजुलाने विजयी चौकार लगावला.

श्रेयाने 102 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या, तर शिखाने 50 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. 154 धावांचे आव्हान स्वीकारलेल्या गोव्यास श्रेया व पूर्वजा वेर्लेकर (23) यांनी 38 धावांची सलामी दिली. गोव्याचा स्पर्धेतील (competition) पुढील सामना सोमवारी हरियानाविरुद्ध विझियानगरम येथे होईल.

त्यापूर्वी, विदर्भाच्या तळाच्या फलंदाजांनी खिंड लढविल्यामुळे त्यांना 6 बाद 79 वरून सर्वबाद 153 धावांची मजल मारता आली. विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Batting) स्वीकारली होती. गोव्यातर्फे निकिता मळीक, पूर्वा भाईडकर यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळविल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT