tennis tournament Kishor Petkar
क्रीडा

tennis tournament : तेजस, राहुल, सूरज यांची आगेकूच

तसेचचा उपउपांत्यपूर्व लढतीत गोव्याच्या राजाराम कुंडईकरवर सोपा विजय

दैनिक गोमन्तक

पणजी : गतउपविजेता तेजस शेवडे, तसेच राहुल सिंग, सूरज बिक्कान्नावर यांनी गद्रे गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच राखताना पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही स्पर्धा मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस व कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर (Panaji Gymkhana Tennis Court) सुरूआहे. (Gadre Gaspar Dias of Tejas, Rahul and Suraj advance in open tennis tournament)

चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या तेजसने उपउपांत्यपूर्व लढतीत गोव्याच्याच राजाराम कुंडईकर याच्यावर 6-0 असा सोपा विजय प्राप्त केला. शेवटच्या आठ खेळाडूंच्या फेरीत स्थान मिळविताना राहुलने मानो छाब्रा याच्यावर 6-1 असा, तर सूरजने अंकित बथेजा याच्यावर 6-3 असा विजय नोंदविला.

महिला (Women) एकेरीत निशिका गोम्स हिने तनिष्का देशपांडे हिचा प्रतिकार मोडून काढताना 6-3 फरकाने विजयाची नोंद केली. निकोल दा सिल्वा हिने रुकून कौल हिला 6-0 असे सहजपणे नमविले.

पुरुष (Men) दुहेरीत राजाराम कुंडईकर व संतोष गोरावर जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठताना एम. आदर्श व जयविन रणजित जोडीवर 6-4 फरकाने मात केली. मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमन बुंदेला व विनोना गुदिन्हो जोडीने वेर्नेर फर्नांडिस व निकोल दा सिल्वा यांच्यावर 6-0 असा विजय नोंदविला. शिवम बापट व कामाक्षी शानभाग जोडीने चुरशीच्या लढतीत काफिल कडवेकर व रितिका धवलकर जोडीचा प्रतिकार टायब्रेकरमध्ये 7-6 (5) असा मोडून काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT