ऑस्ट्रेलियात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची निवड कधी होणार याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. इनसाइडस्पोर्टनुसार, आशिया चषक स्पर्धेनंतर 4 दिवसांनी 15 सप्टेंबर रोजी निवड समितीची मुंबईत बैठक होणार असून त्याच दिवशी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
(Team India will be selected for T20 World Cup on this day; Date revealed)
तत्पूर्वी, निवडकर्त्यांना आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची कामगिरीही पाहायला मिळणार असून या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात निवडण्याची संधी मिळणार आहे.
आशिया कपचा अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. याचा अर्थ, यूएईमधून खेळाडू परतल्यानंतर टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड होईल. भारत 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीने 16 सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. प्रत्येक संघ 15 सदस्यीय संघ घोषित करू शकतो. स्पर्धेत सहभागी होणारे संघ 30 सदस्यांपर्यंत प्रवास करू शकतात. यामध्ये खेळाडूंव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफचे सदस्यही सहभागी आहेत. एकूण 23 सदस्य अधिकृत पथकाचा भाग असतील. त्यात 15 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या 8 सदस्यांचा समावेश असेल.
22 ऑक्टोबरपासून सुपर-12 फेरी होणार आहे
याशिवाय सदस्य देश स्वखर्चाने स्पर्धेसाठी 7 अतिरिक्त लोक घेऊ शकतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या 7 सदस्यांमध्ये नेट बॉलर, सपोर्ट स्टाफचे अतिरिक्त सदस्य असू शकतात. आयसीसीने प्रत्येक संघाला सोबत डॉक्टर आणणे बंधनकारक केले आहे. T20 विश्वचषकाची पात्रता फेरी 16 ऑक्टोबरपासून तर सुपर-12 फेरी 22 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
संघात बदली कशी होईल?
15 सदस्यीय संघात बदली देखील केवळ आरोग्याच्या कारणास्तव शक्य होणार आहे. जो संघ बदलीची मागणी करेल, त्यासाठी त्याला आयसीसीने स्थापन केलेल्या समितीची मान्यता घ्यावी लागेल. 15 सदस्यीय संघात समाविष्ट असलेले खेळाडूच विश्वचषक खेळण्यास पात्र असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.