Team India Dainik Gomantak
क्रीडा

चाहत्यांसाठी खूशखबर, टीम इंडियाचा Whatsapp ग्रुप सुरु; जॉईन करण्यासाठी 'या' स्टेप्स करा फॉलो!

Team India Whatsapp Group: आशिया कप 2023 दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

Manish Jadhav

Team India Whatsapp Group: आशिया कप 2023 दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरु केला आहे.

त्यात जॉईन होऊन, चाहत्यांना थेट सामन्याचे अपडेट्स, खास फोटो, ताज्या बातम्या मिळू शकतील. एकूणच, हे तुम्हाला बीसीसीआय आणि टीम इंडियाबद्दल पूर्णपणे अपडेट ठेवेल. या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुम्हाला असे जॉइन व्हावे लागेल

बीसीसीआयने (BCCI) फेसबुकवर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला https://www.whatsapp.com/channel/0029Va2vqMCEAKWNmmDERM3A या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलवर रीडायरेक्ट केले जाईल.

त्यानंतर तुम्हाला ग्रुप जॉईन करण्यासंबंधी माहिती मिळेल. ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला नवीन अपडेट्स मिळतील. मात्र, या ग्रुपमध्ये अॅड होणाऱ्या यूजर्सची माहिती नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहे.

टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे

मात्र, टीम इंडियाबद्दल (Team India) बोलायचे झाल्यास, आशिया कप 2023 च्या सुपर-4 मध्ये भारतीय संघ शुक्रवारी बांगलादेशशी भिडणार आहे. तथापि, या सामन्यात दोन्ही संघांकडे गमावण्यासारखे काहीच नाही कारण टीम इंडिया आधीच अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर बांगलादेश शर्यतीतून बाहेर पडला आहे.

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या 39 एकदिवसीय सामन्यांपैकी टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने 7 सामने जिंकले आहेत.

एका सामन्याचा निकाल लागला नाही. या सामन्यात भारतीय संघ काय कॉम्बिनेशन करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT