Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज आशिया कपमधून बाहेर!

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-फोर टप्प्यात भारताचा सामना करण्यापूर्वी बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे.
Mushfiqur Rahim
Mushfiqur Rahim Dainik Gomantak

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-फोर टप्प्यात भारताचा सामना करण्यापूर्वी बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम स्पर्धेबाहेर गेला आहे.

मुलाच्या जन्मामुळे 36 वर्षीय मुशफिकूर भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. भारतविरुद्ध बांगलादेश सामना शुक्रवारी (15 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.

भारताने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर बांगलादेश सध्याच्या टप्प्यात सलग दोन पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर आहे. बांगलादेशचा शेवटचा सामना शुक्रवारी होणार आहे.

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध सुपर-फोरचा सामना मुशफिकुर रहीमशिवाय खेळणार आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मुशफिकुरची रजा वाढवली आहे, जेणेकरुन तो आपल्या मुलासोबत आणि कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवू शकेल.

विशेष म्हणजे, मुशफिकुरने या स्पर्धेत एकूण चार सामने खेळले आणि 131 धावा केल्या. या काळात त्याने अर्धशतके झळकावली. मुशफिकुरने लाहोरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 87 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 64 धावा केल्या होत्या.

Mushfiqur Rahim
Asia Cup 2023: भारतासमोर फायनलमध्ये कोणाचं आव्हान? पाकिस्तान-श्रीलंका संघांचं भवितव्य 'या' सामन्यावर

दुसरीकडे, शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाला सध्या एक विजय मिळाला आहे. बांगलादेशने ग्रुप स्टेजमध्ये अफगाणिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता.

मात्र, ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेशला (Bangladesh) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. यानंतर बांगलादेशला पुढच्या फेरीत पाकिस्तानकडून 7 गडी राखून आणि श्रीलंकेविरुद्ध 21 धावांनी पराभव पत्करावा लागला.

त्याचवेळी, मंगळवारी भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. भारत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. गुरुवारी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजयी संघ 17 सप्टेंबरला अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com