Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli करणार आज हा महारेकॉर्ड! कोणत्याही भारतीय फलंदाजाला...

Virat Kohli Milestone: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील निर्णायक सामना आज संध्याकाळी 7:00 वाजता हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील निर्णायक सामना आज संध्याकाळी 7:00 वाजता हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे, जो कोणी हा सामना जिंकेल त्याच्या ताब्यात T20 मालिका जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो. आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा विक्रम आपल्या नावावर करता आलेला नाही.

आज कोहली हा मोठा विक्रम आपल्या नावावर करणार!

जर विराट कोहलीने (Virat Kohli) आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) तिसऱ्या T20 सामन्यात 85 धावा केल्या तर एकूण T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरेल. आत्तापर्यंत कोणताही भारतीय फलंदाज हा विक्रम करु शकलेला नाही. विराट कोहलीने हे केले तर तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मोठी कामगिरी करेल.

कोणत्याही भारतीय फलंदाजाला हे करता आले नाही

विराट कोहलीने आतापर्यंत 351 टी-20 सामन्यांमध्ये 40.12 च्या सरासरीने 10915 धावा केल्या आहेत. 85 धावा केल्यानंतर, विराट T20 क्रिकेटमध्ये 11000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारतातील पहिला आणि जगातील चौथा फलंदाज बनेल. एकूण T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ ख्रिस गेल (Chris Gayle), शोएब मलिक आणि किरॉन पोलार्ड यांनी 11000 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा चमत्कार केला आहे.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 463 सामन्यात 14562 धावा

2. शोएब मलिक (पाकिस्तान) - 481 सामन्यात 11902 धावा

3. किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) - 613 सामन्यात 11902 धावा

4. विराट कोहली (भारत) - 351 सामन्यात 10915 धावा

5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 328 सामन्यात 10870 धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर 71 शतके आहेत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर आता 71 शतके आहेत. विशेष म्हणजे, या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची (Ricky Ponting) बरोबरी केली आहे. रिकी पाँटिंगनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतके झळकावली आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतके

2. विराट कोहली (भारत) - 71 शतके / रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतके

3. कुमार संगकारा (श्रीलंका) - 63 शतके

4. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 62 शतके

5. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) - 55 शतके

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

SCROLL FOR NEXT