Afghanistan team

 

Dainik Gomantak

क्रीडा

टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळणार, जाणून घ्या

अफगाणिस्तान (Afghanistan) संघ पुढील वर्षी भारत (India) दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मर्यादित षटकांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तान (Afghanistan) संघ पुढील वर्षी भारत (India) दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मर्यादित षटकांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) होणार असल्याचे मानले जात आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) सोमवारी जाहीर केले की, अफगाणिस्तान संघ मार्चमध्ये भारताचा दौरा करेल आणि मर्यादित षटकांची मालिका खेळेल.

दरम्यान, फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) अंतर्गत, अफगाणिस्तान 2022-23 मध्ये 11 वनडे इंटरनेशनल, चार T20 इंटरनेशनल आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेशिवाय अफगाणिस्तान 2022 मध्ये नेदरलँड, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडविरुद्धही मालिका खेळणार आहे. T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup) मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात शेवटचा सामना खेळला गेला होता, जो भारताने 66 धावांनी जिंकला होता.

तसेच, तालिबान आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असून अद्याप तालिबानने अफगाणिस्तानच्या महिला संघाला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिलेली नाही. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अफगाणिस्तानकडून पूर्ण क्रिकेट राष्ट्रचा दर्जा काढून घेऊ शकते. याशिवाय, तालिबान राजवटपासून अफगाणिस्तानने कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटला परवानगी नसल्यामुळे ऑस्ट्रेलियानेही अफगाणिस्तान संघाला त्यांच्या देशात आमंत्रित करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

याशिवाय, भारताबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळायची आहे. यानंतर संघाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतेल आणि आयपीएल 2022 पूर्वी अनेक द्विपक्षीय मालिकांमध्ये भाग घेईल. वेस्ट इंडिज संघालाही भारत दौऱ्यावर जावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT