ऑस्ट्रेलियाने (Australia) 2022 मध्ये होणाऱ्या मेन्स ICC अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (ICC U19 World Cup) संघाची घोषणा केली आहे. ही आयसीसी स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) खेळवली जाणार आहे, ज्यासाठी ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यीय संघ निवडला आहे. कूपर कॉनलीलाही या संघात स्थान मिळाले आहे, ज्याचा दुसरा अंडर 19 वर्ल्ड कप आहे. याआधी तो दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. कूपर व्यतिरिक्त, 17 वर्षीय हरकीरत बाजवाने (Harkirat Bajwa) देखील संघात आपले स्थान निश्चित केले आहे. आयसीसी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला ड गटात ठेवण्यात आले आहे. याशिवाय यजमान वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि श्रीलंका (Sri Lanka) हे संघ या गटात आहेत. 15 सदस्यीय ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक अँथनी क्लार्क असणार आहेत.
संघात सर्व प्रकारचे खेळाडू - प्रशिक्षक
ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक अँथनी क्लार्क म्हणाले, “आमच्या संघात सर्व प्रकारचे खेळाडू आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव असलेले खेळाडू संघात आहेत. त्यांच्यामध्येही असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी यापूर्वी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. ते पुढे म्हणाला, “मला खात्री आहे की अंडर-19 वर्ल्ड कप खेळून या खेळाडूंच्या कामगिरीत भर पडेल. त्यांच्यासाठी संधीचा फायदा घेण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे हे सर्वजण ही स्पर्धा कशी घेतात आणि त्यात कशाप्रकारे आपल्या संघांची भूमिका ठेवतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
ICC U19 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा 15 सदस्यीय संघ:
हरकिरत बाजवा, एडन काहिल, कूपर कॉनली, जोशुआ गार्नर, इशाक हिगिन्स, कॅम्पबेल केलवे, कोरी मिलर, जॅक निस्बेट, निवेतन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, लकलन शॉ, जॅक्सन सेनफेल्ड, टोबियास स्नेल, टॉम विटनी, टिग विली.
राखीव खेळाडू: लियाम ब्लॅकफोर्ड, लियाम डोड्रेल, जोएल डेव्हिस, सॅम राहले, अनुब्रे स्टॉकडेल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.