Team India Victory Parade Dainik Gomantak
क्रीडा

Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजयाचे सेलिब्रेशन! कुठे होणार 'व्हिक्ट्री परेड'? दिल्लीत की मुंबईत? सर्व जाणून घ्या

T20 World Cup Winner Team India Victory Parade: भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून संपूर्ण देशाला आनंदाच्या भरात बुडवले आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून संपूर्ण देशाला आनंदाच्या भरात बुडवले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने तिसऱ्यांदा ही मानाची ट्रॉफी उंचावली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे ते म्हणजे टीम इंडियाच्या 'व्हिक्ट्री परेड'कडे. आपल्या लाडक्या चॅम्पियन्सना जवळून पाहण्यासाठी आणि त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

व्हिक्ट्री परेडबाबत अधिकृत घोषणा कधी?

सध्या सोशल मीडियावर 'व्हिक्ट्री परेड' कधी आणि कुठे निघणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. भारतीय संघ ८ मार्चच्या रात्रीपर्यंत अहमदाबादमध्येच होता. लवकरच बीसीसीआय या विजयाची मिरवणूक कशी आणि कधी काढायची, याचे नियोजन जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.

२००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या विजयानंतरही अशाच भव्य विजय यात्रा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाही मुंबई किंवा दिल्लीमध्ये ही परेड आयोजित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्ली की मुंबई: कुठे होणार जल्लोष?

विजय यात्रेचे आयोजन नक्की कोणत्या शहरात होणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. तरीही, क्रिकेटच्या पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईचे नाव रेसमध्ये सर्वात पुढे आहे. याशिवाय, टीम इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटीचे कार्यक्रमही निश्चित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिल्लीतही हा जल्लोष पाहायला मिळू शकतो. ९ किंवा १० मार्च रोजी हा कार्यक्रम होण्याची चिन्हे आहेत. ही विजय यात्रा 'ओपन टॉप बस'मधून काढली जाण्याची परंपरा आहे, ज्यामुळे चाहते आपल्या हिरोंना जवळून पाहू शकतील.

फायनलमध्ये भारताचा एकतर्फी विजय

टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना भारतासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने संजू सॅमसन (८९), अभिषेक शर्मा (५२) आणि ईशान किशन (५४) यांच्या दणदणीत खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघ १९ व्या षटकात १५९ धावांत गारद झाला. जसप्रीत बुमराहने ४ आणि अक्षर पटेलने ३ बळी टिपत विजयावर शिक्कामोर्तब केले. बुमराहला 'प्लेअर ऑफ द मॅच' तर संजू सॅमसनला 'प्लेअर ऑफ द सिरीज'चा बहुमान देऊन गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT