Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

SA vs IND: संजूचा शतकी जलवा; टीम इंडियाने द. आफ्रिकेला दिलं 297 धावाचं विशालकाय लक्ष्य

South Africa vs India, 3rd ODI: पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

South Africa vs India, 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (21 डिसेंबर) खेळवला जात आहे. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने 50 षटकांत आठ विकेट गमावत 296 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य दिले आहे.

भारताने द. आफ्रिकेला विशालकाय लक्ष्य दिले

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी यावे लागले. भारताने 50 षटकांत आठ विकेट गमावत 296 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 108 आणि तिलक वर्माने 52 धावा केल्या. सॅमसनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक तर तिलकने पहिले अर्धशतक झळकावले. दोन्ही खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली.

दुसरीकडे, रिंकू सिंहने 27 चेंडूत 38 धावा, पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या रजत पाटीदारने 16 चेंडूत 22 धावा आणि कर्णधार केएल राहुलने 35 चेंडूत 21 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 14 धावा करुन बाद झाला तर साई सुदर्शन 10 धावा करुन बाद झाला. अक्षर पटेलला एकच धाव करता आली. अर्शदीप सिंग सात धावा करुन नाबाद राहिला आणि आवेश खान एक धाव काढून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गरला दोन विकेट्स मिळाल्या. लिझार्ड विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

संजूने 108 धावांची इनिंग खेळली

तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत 108 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान संजूने 6 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिलेच शतक आहे. आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही संजूशी हस्तांदोलन करताना दिसले. आपल्या फलंदाजीदरम्यान संजूने केवळ भारतीय डाव सावरला नाही तर संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीत नेल्यानंतर तो बाद झाला.

आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये चढ-उतार

यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. संघातही त्याला अशी विशेष संधी मिळाली नाही. या सामन्यापूर्वी संजूने टीम इंडियासाठी 15 एकदिवसीय सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने 3 अर्धशतके झळकावली, तर त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नव्हते. आता संजू सॅमसनच्या नावावर 16 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 510 धावा आहेत. ज्यामध्ये 3 अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT