Virat Kohli | Rohit Sharma BCCI
क्रीडा

SA vs IND: आता रंगणार कसोटीचा थरार! विराट-रोहितचे कमबॅक, टीम इंडियाचा कसून सराव, पाहा Video

Team India Practice Session: दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे.

Pranali Kodre

Team India Practice Session for Test Series against South Africa:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 आणि वनडे मालिका संपली असून मंगळवारपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी तयारीला सुरुवात केली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होणारी कसोटी मालिका ही टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघ सराव करत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करताना दिसत आहेत.

या व्हिडिओत भारताचा कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, केएल राहुल, रविंद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर असे अनेक खेळाडू सराव करताना दिसत आहेत.

विराट-रोहित यांचे पुनरागमन

दरम्यान, या कसोटी मालिकेतून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह अशा खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे.

या खेळाडूंनी 2023 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे जवळपास एक महिन्यानंतर हे खेळाडू भारताकडून खेळताना दिसणार आहेत. त्याचमुळे त्यांना पुन्हा मैदानात पाहाण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत.

या मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार अशा नवीन चेहऱ्यांना भारतीय संघात संधी मिळाली आहे. मात्र, या मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा अशा अनुभवी खेळाडूंना संघातून बाहेर करण्यात आले आहे.

पहिली मालिका जिंकण्याचा प्रयत्न

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये 8 कसोटी मालिका आत्तापर्यंत झाल्या आहेत. पण एकदाही भारताने मालिका विजय मिळवलेला नाही. भारताने 2010-11 मध्ये एकदाच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत बरोबरी साधली आहे. बाकी 7 मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवले आहेत.

भारताचा कसोटी संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू, केएस भरत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT