Team India Playing cricket like 2010 game says Michael Wan Dainik Gomantak
क्रीडा

'भारतीय संघ 2010 चे क्रिकेट खेळत आहे', इंग्लंडच्या माजी कर्णधाराने डिवचले

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ट्विट करून भारतावर हल्ला चढवला असून भारतीय क्रिकेट संघ दशकभर जुने क्रिकेट खेळत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला ICC T -20 World Cup-2021 मध्ये विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते, परंतु भारताला संघाला आता उपांत्य फेरी गाठणे कठीण होत आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून (Pakistan) 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, तर रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघानेही भारताची चांगलीच धुलाई केली होती (INDvsNZ). भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे, तसेच अनेकांनी आता भारतीय संघावर टीका करायला सुरुवात केली आहे. (Team India Playing cricket like 2010 game says Michael Wan)

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल (Michael Wan) वॉनने ट्विट करून भारतावर हल्ला चढवला असून भारतीय क्रिकेट संघ दशकभर जुने क्रिकेट खेळत असल्याचे म्हटले आहे. वॉनने दोन ट्विट केले. दुसऱ्या ट्विटमध्ये वॉनने म्हटले आहे की, भारतीय संघ कदाचित या विश्वचषकातून बाहेर पडेल. वॉनने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले.“भारतीय संघ 2010 चे क्रिकेट खेळत आहे. मात्र आता खेळ बदलला आहे." दुसऱ्या ट्विटमध्ये वॉनने लिहिले की, 'भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडू शकतो. संघाची मानसिकता आणि दृष्टीकोन, सर्व कौशल्यांसह, आतापर्यंत चुकीचे झाले आहे."असे विधान देखील त्याने केले आहे.

वॉन तिथेच थांबला नाही. त्याने भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरलाही गुंडाळले. ट्विटरवर या दोघांमध्ये वाद होत असतात. दोघेही ट्विटरवर विनोद करत असतात. वॉनने जाफरच्या जखमेवर मीठ शिंपडण्याची एकही संधी सोडली नाही आणि ट्विट करून जाफरला त्याची तब्येत विचारली. वॉनने ट्विट केले की, 'वसीम जाफर कसा आहेस.'

दरम्यान काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संघाच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारताला मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. भारताच्या भक्कम फलंदाजीला सात विकेट्सच्या मोबदल्यात 110 धावाच करता आल्या. त्याच्याकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने नाबाद 26 धावांची खेळी खेळली. हार्दिक पांड्याने 23 धावा केल्या. केएल राहुलने 18, रोहित शर्माने 14 आणि ऋषभ पंतने 12 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन विकेट घेतल्या.

नंतर यानंतर भारतीय संघाच्या गोलंदाजांना छोटी धावसंख्या वाचवता आली नाही. न्यूझीलंडकडून डार्ली मिशेलने 49 धावांची खेळी खेळली. मार्टिन गप्टिलने 20 धावा केल्या. कर्णधार विल्यमसन 33 धावांवर नाबाद राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: Formula – 4 मुरगावमध्ये होणार; मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT