Jasprit Bumrah  Dainik Gomantak
क्रीडा

Jasprit Bumrah: पाठीची दुखापत ठरली त्रासदायक, सर्जरीसाठी आता बुमराह करणार 'या' देशात उड्डाण

जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून आता त्याला सर्जरी करावी लागण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची वाट अनेक चाहते पाहात आहेत. पण आता त्याचे पुनरागमन आणखी लांबले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. (Jasprit Bumrah to undergo back surgery in New Zealand)

रिपोर्ट्सनुसार बुमराह शक्य तेवढ्या लवकर पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूझीलंडला जाणार आहे. बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याचा याच दुखापतीमुळे गेल्यावर्षी एशिया कप आणि टी२० वर्ल्डकप खेळता आला नव्हता.

दरम्यान, अशीही माहिती समोर आली आहे की की बीसीसीआयच्या मेडिकल टीमने आणि बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील मॅनेजरने मिळून न्यूझीलंडमधील काही सर्वोत्तम सर्जन शोधले आहेत, जे बुमराहच्या दुखापतीवर काम करू शकतात.

त्यामुळे सध्यातरी दुखापतीतून पूर्ण सावरण्यासाठी आता त्याला 5 ते 6 महिने वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तो आयपीएल 2023 आणि जर भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात जागा मिळवली, तर त्या सामन्याला मुकण्याचीच शक्यता दाट आहे.

त्यामुळे हा केवळ भारतीय संघासाठीच नाही, तर मुंबई इंडियन्स संघासाठीही मोठा धक्का आहे. कारण आयपीएल 2023 हंगाम 31 मार्चपासून सुरु होत आहे आणि या हंगामात मुंबईला त्यांचा प्रमुख गोलंदाज असलेल्या बुमराहची कमी जाणवू शकते.

तसेच तो आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुनरागमन करू शकतो. त्यामुळे तो थेट ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसू शकतो. पण, जर तोपर्यंत देखील तो पूर्ण तंदुरुस्त झाला नाही, तर भारताला मोठा धक्का बसू शकतो.

पाच महिन्यांपासून क्रिकेटमधून बाहेर

गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता. त्यानंतर अद्याप त्याचे पुनरागमन झालेले नाही.

जसप्रीत बुमराहची कामगिरी

जसप्रीत बुमराह भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीमध्ये 30 सामन्यांत 128 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 72 वनडे सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 70 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT