Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, हा स्टार फलंदाज वेस्ट इंडिज दौऱ्यातून आउट!

Team India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांची T20 मालिका 29 जुलैपासून सुरु होत आहे.

दैनिक गोमन्तक

Team India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांची T20 मालिका 29 जुलैपासून सुरु होत आहे. या मालिकेसाठी संघातील स्टार खेळाडू वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत. मात्र या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा एक स्टार फलंदाज या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. हा खेळाडू IPL 2022 पासून एकदाही टीम इंडियामध्ये खेळताना दिसलेला नाही.

हा खेळाडू टी-20 मालिकेतून बाहेर पडला

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्ध ही 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीमचा उपकर्णधार केएल राहुल या मालिकेतून बाहेर झाला आहे. केएल राहुल गेल्या आठवड्यातच कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने राहुलला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत आता या मालिकेत त्याचे खेळणे अशक्य झाले आहे.

नुकताच दुखापतीतून सावरला

केएल राहुल (KL Rahul) आयपीएल 2022 पासून टीम इंडियाचा भाग नाहीये. राहुलला जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी-20 मालिकेपूर्वी दुखापत झाली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात राहुलवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सरावासाठी गेला होता. वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागली होती, परंतु केएल राहुलला आधीच कोरोनाचा संसर्ग झाला. तथापि, केएल राहुलच्या बाहेर पडण्याची अधिकृत पुष्टी बीसीसीआयने अद्याप केलेली नाही.

या दौऱ्यावर संघात पुनरागमन करणार

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाला (Team India) झिम्बाब्वेचा दौरा करायचा आहे. टीम इंडिया 6 वर्षांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 3 वनडे सामने खेळायचे आहेत. 18 ऑगस्टपासून हा दौरा सुरु होणार आहे. जर केएल राहुल या दौऱ्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला तर तो संघाचा भाग होऊ शकतो. या दौऱ्यावर खेळण्यासोबतच केएल राहुल संघाचे कर्णधारपदही भूषवताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT