Jason Holder Corona Virus: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना (IND vs WI 2022) सुरु आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यादरम्यान यजमानांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. वास्तविक, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जेसन होल्डर वेस्ट इंडिज संघातून बाहेर पडला आहे. नुकताच भारताचा सलामीवीर केएल राहुलचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
वेस्ट इंडिजचे पहिले क्षेत्ररक्षण
विशेष म्हणजे, भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क येथे पहिला वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या भारताचा (India) सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) क्रीजवर आहेत.
जेसन होल्डर कोरोना पॉझिटिव्ह
सध्या कर्णधार शिखर धवन 12 चेंडूत 10 धावा तर शुभमन गिल 13 चेंडूत 18 धावा करुन खेळत आहे. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डर या सामन्यात खेळत नाहीये. वास्तविक, जेसन होल्डरचा कोरोना रिपोर्ट आला, ज्यामुळे तो पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाचा भाग नाही. भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे 24 जुलै रोजी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.