Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

Team India: भारतीय खेळाडूंनी 'सुपर फॅन'चा दिवस बनवला स्पेशल, पाहा Video

भारतीय संघ शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार असून त्याआधी खेळाडूंनी त्यांच्या खास चाहत्याशी संवाद साधला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका पूर्ण झाली असून आता वनडे मालिकेला शुक्रवारी सुरुवात होईल. पण, त्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या खास चाहत्याचा दिवस खास बनवला आहे.

गुरुवारी भारतीय संघातील काही खेळाडू ऑकलंडमध्ये त्यांच्या एका दिव्यांग चाहत्याला भेटले. या चाहत्याचे नाव दिव्यांश आहे. शिखर धवन, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, उमरान मलिक अशा काही खेळाडूंनी दिव्यांशबरोबर फोटोही काढले.

भारतीय संघ (Team India) दिव्यांशला भेटल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने लिहिले आहे की ''वनडे मालिकेच्या आधी ऑकलंडमध्ये संस्मरणीय संवादानंतर भारतीय संघाचा 'सुपर फॅन' दिव्यांशसाठी आनंदाचा क्षण."

दरम्यान, भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) पहिला वनडे सामना ऑकलंडमधील इडन पार्कमध्ये शुक्रवारी पार पडणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरला दुसरा आणि 30 नोव्हेंबरला तिसरा वनडे सामना अनुक्रमे हेमिल्टन आणि ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7:00 वाजता सुरू होतील.

यापूर्वी भारतीय संघाने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशा फरकाने विजय मिळवला आहे. आता वनडे मालिका शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळली जाणार आहे. या न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यामुळे या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे.

वनडे मालिकेसाठीचा पूर्ण भारतीय संघ:

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, ऋषभ पंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT