Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: तिसरी वनडे जिंकताच टीम इंडियाला होणार डबल फायदा, 'शत्रू' देशांना...!

India vs New Zealand 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमध्‍ये खेळला जाणारा शेवटचा वनडे सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.

या सामन्यात भारतीय संघासाठी बरेच काही पणाला लागणार आहे. श्रीलंकेला क्लीन स्वीप केल्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल.

टीम इंडियाचे लक्ष क्लीन स्वीपकडे आहे

मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांनंतर टीम इंडिया ICC मेन्स वनडे रॅंकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ही मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडिया (Team India) चौथ्या क्रमांकावर होती. त्याचवेळी, इंग्लंड सध्या या क्रमवारीत अव्वल आहे. तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर होता.

टीम इंडिया सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे

मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांनंतर टीम इंडिया ICC मेन्स वनडे रॅंकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर होती. त्याचवेळी, इंग्लंड सध्या या क्रमवारीत अव्वल आहे. तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर होता.

अशातच उभय संघांमधील दुसरा वनडे सामना रंगला

या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा (New Zealand) संघ 108 धावांवर गडगडला. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने या सामन्यात सर्वाधिक 3 बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 विकेट घेतल्या.

तसेच, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनीही 1-1 विकेट घेण्यात यश मिळवले. यानंतर 109 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 51 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

SCROLL FOR NEXT