India Vs New Zealand: न्यूझीलंडच्या फंलदाजांची शमीने ठेचली नांगी, पाहा Vedio

India Vs New Zealand 2nd ODI: नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला.
Mohammed Shami
Mohammed Shami Dainik Gomantak

India Vs New Zealand 2nd ODI: टीम इंडिया रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दुसरा वनडे सामना खेळत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. शहीद व्ही नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. रोहित शर्माने गोलंदाजी निवडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची फलंदाजी उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

दरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या ओपनरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या (New Zealand) सलामीवीरांना कात टाकली. भारताला पहिले यश मिळाले. शमीला खेळपट्टीची चांगली मदत मिळाली. शमीला पहिल्या चेंडूपासूनच स्विंग मिळत होता.

Mohammed Shami
India vs New Zealand: दुसऱ्या वनडेत किवींना चॅलेंज देण्यासाठी टीम इंडिया सज्ज, जाणून घ्या Playing XI

पहिल्या वनडेत घातक फलंदाजी केली

फिन ऍलन हा एक तुफानी फलंदाज असून पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने विस्फोटक फलंदाजी केली होती. परंतु दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) त्याला खातेही उघडू दिले नाही आणि पहिल्याच षटकात त्याला आऊट केले. तर, चौथ्या षटकात त्याने डॅरेल मिशेलचा खेळ संपवला. मिशेलने शमीकडे झेल सोपवला.

यानंतर शमीने मागील सामन्यात शतक झळकावून सामना रोमांचक करणाऱ्या मायकेल ब्रेसवेलला बाद केले.

Mohammed Shami
India vs New Zealand: गिलचा थरार, सिराजचा धमाका; टीम इंडियाचा रोमांचक विजय

तसेच, रायपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने आपल्या प्लेइंग 11 मध्ये छेडछाड केलेली नाही. पहिल्या वनडेत संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंना दुसऱ्या वनडेतही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडनेही आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com