Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: चौथ्यांदा फायनल खेळणार भारतीय संघ! पाहा यंदा कोणाविरुद्ध मिळवले विजय अन् सामन्याचे हिरो

Pranali Kodre

Team India Journey in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

या अंतिम सामन्याआधी भारताने सलग 10 विजय मिळत प्रवेश केला आहे. तसेच भारतीय संघ चौथ्यांदा वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. भारताने यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे, त्यातील 1983 आणि 2011 साली विजय मिळवला आहे.

दरम्यान वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता आणि कोणत्या संघांना किती फरकाने पराभूत केले, यावर एक नजर टाकू.

साखळी फेरी

  • पहिला सामना - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. या सामन्यात नाबाद 97 धावा करणारा राहुल सामनावीर ठरला.

  • दुसरा सामना - भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दिल्ली)

भारतीय संघाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यात 131 धावा करणारा कर्णधार रोहित शर्मा सामनावीर ठरला.

  • तिसरा सामना - भारत विरुद्ध पाकिस्तान (अहमदाबाद)

भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात 7 षटकात 19 धावा देत 2 विकेट्स घेतलेला जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.

  • चौथा सामना - भारत विरुद्ध बांगलादेश (पुणे)

भारतीय संघाने हा सामनाही 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात नाबाद 103 धावांची खेळी करणारा विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार जिंकला.

  • पाचवा सामना - भारत विरुद्ध न्यूझीलंड (धरमशाला)

भारतीय संघाने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. या सामन्यात 10 षटकात 54 धावा देत 5 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी सामनावीर ठरला.

  • सहावा सामना - भारत विरुद्ध इंग्लंड (लखनऊ)

भारतीय संघाने हा सामना 100 धावांनी जिंकला. या सामन्यात 87 धावा करणारा कर्णधार रोहित शर्माने सामनावीर पुरस्कार जिंकला.

  • सातवा सामना - भारत विरुद्ध श्रीलंका (मुंबई)

भारतीय संघाने हा सामना तब्बल 302 धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 5 षटकात 18 धावा देत 5 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीला मिळाला.

  • आठवा सामना - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलकाता)

भारतीय संघाने 243 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात 101 धावा करणारा विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

  • नववा सामना - भारत विरुद्ध नेदरलँड्स (बंगळुरु)

भारताने हा सामना 160 धावांनी जिंकला. या सामन्यात 94 चेंडूत 128 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने सामनावीर पुरस्कार जिंकला.

  • उपांत्य फेरी - भारत विरुद्ध न्यूझीलंड (मुंबई)

भारताने हा सामना 70 धावांनी जिंकला. या सामन्यात 9.5 षटकात 57 धावा देत 7 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT