Team India Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings: भारत बनला जगातील नंबर 1 कसोटी संघ, नावावर केला सुपर रेकॉर्ड

Team India: टीम इंडियाच्या नावावर एक ऐतिहासिक सुपर रेकॉर्ड जमा झाला आहे.

Manish Jadhav

ICC Rankings: टीम इंडियाच्या नावावर एक ऐतिहासिक सुपर रेकॉर्ड जमा झाला आहे. वास्तविक, भारतीय क्रिकेट संघाने अशी अद्भुत कामगिरी करुन नवा इतिहास रचला आहे. ICC ने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे, त्यानुसार भारत आता जगातील नंबर 1 कसोटी संघ आहे. नागपूर कसोटीतील विजयानंतर भारताचे आता 115 गुण झाले असून ऑस्ट्रेलियाचा संघ 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

टीम इंडियाचा ऐतिहासिक 'विक्रम'

यासह, भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 संघ बनला आहे. टीम इंडिया सध्या कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जगातील नंबर 1 संघ आहे. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

प्रथमच इतिहास रचला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी जगातील नंबर-1 संघ बनून भारताने नवा इतिहास रचला आहे. याआधी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या, कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी जगातील नंबर-1 टीम बनू शकली नाही, परंतु आता टीम इंडियाने हा मोठा विक्रम केला आहे.

दरम्यान, 2013 मध्ये भारतापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी, ODI आणि T20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी फक्त एकच संघ जगातील नंबर-1 संघ बनू शकला होता आणि तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. 2013 मध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी जगातील नंबर-1 संघ बनण्याचा मान मिळवला. दक्षिण आफ्रिकेनंतर आता टीम इंडियाने हा मोठा विक्रम केला आहे.

आयसीसी क्रमवारीत भारतीय क्रिकेटचे वर्चस्व

नंबर 1 कसोटी संघ - भारत

नंबर 1 टी20 संघ - भारत

नंबर 1 वनडे संघ - भारत

नंबर 1 टी-20 फलंदाज - सूर्या

नंबर 1 वनडे गोलंदाज - सिराज

नंबर 1 कसोटी अष्टपैलू खेळाडू - जडेजा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT