Harbhajan Singh | T20 world cup 2022
Harbhajan Singh | T20 world cup 2022  Dainik Gomantak
क्रीडा

Harbhajan Singh: रोहित-विराटने T20 क्रिकेट खेळणे थांबवावे? भज्जीच्या या वक्तव्याने उडाली खळबळ

दैनिक गोमन्तक

Harbhajan Singh: भारताचा स्टार ऑफस्पिनर हरभजन सिंगने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. T20 विश्वचषक 2022 दरम्यान, कमकुवत सलामीच्या जोडीमुळे टीम इंडियाची पहिल्या 6 षटकांमध्ये फलंदाजी खूपच संथ होती.

दरम्यान, हरभजन सिंगने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी-20 फॉरमॅटमधील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोठा सल्ला दिला आहे. हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) मते, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट वाढवायला हवा.

दुसरीकडे, पीटीआयशी बोलताना हरभजन म्हणाला की, 'टी-20 क्रिकेटमध्ये पहिली 6 षटके खूप महत्त्वाची असतात, हे लक्षात घेऊन आम्हाला टी-20 फॉरमॅटमध्ये आमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जर आम्हाला यात यश मिळाले नाही, तर आम्हाला 20 चेंडूत 50 धावा करण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) अवलंबून राहावे लागेल, जे खूप धोकादायक आहे.'

हरभजन सिंग पुढे म्हणाला की, 'याचं कारण म्हणजे, जर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याही फ्लॉप ठरले, तर तुम्ही संपाल. T20 विश्वचषक 2022 मध्ये देखील ही कमजोरी टीम इंडियावर भारी पडली होती. T20 वर्ल्ड कप 2022 दरम्यान, कमकुवत सलामीच्या जोडीमुळे टीम इंडियाची पहिल्या 6 षटकांमध्ये फलंदाजी खूपच संथ होती. रोहित शर्मा एका सामन्यात तर केएल राहुल दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरला.'

तसेच, T20 विश्वचषक 2022 मध्ये सलामी जोडीच्या संथ सुरुवातीमुळे सर्व दबाव सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंवर होता. हरभजन सिंग पुढे म्हणाला की, 'जेव्हा इंग्लंडच्या संघाने व्हाईट चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपली शैली बदलली तेव्हा त्यांनी 2 विश्वचषक जिंकले.'

हरभजन सिंग पुढे म्हणाला, 'T20 क्रिकेटमध्ये तुम्हाला तुफान फटकेबाजी करण्याची गरज असून त्यासाठी टॉप 3 फलंदाजांनी (राहुल, रोहित आणि विराट) त्यांचा स्ट्राइक रेट वाढवला पाहिजे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT