New Zealand | Team India Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs SL: न्यूझीलंडच्या विजयाने टीम इंडियाचं WTC Final तिकीट पक्कं! रोमांचक सामन्यात श्रीलंका पराभूत

World Test Championship: न्यूझीलंडने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत पराभूत केल्याने भारतीय संघाचा टेस्ट चॅम्पियनशीपमधील प्रवेश पक्का झाला.

Pranali Kodre

New Zealand vs Sri Lanka: सोमवारी न्यूझीलंड क्रिकेट संघाने श्रीलंकन क्रिकेट संघाला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 2 विकेट्सने पराभूत केले आहे. श्रीलंकेच्या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाचा दुसऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित झाला आहे.

त्यामुळे यंदा जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता.

नक्की काय होते समीकरण

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात थेट पोहचण्यासाठी भारतीय संघाला सध्या सुरू असलेल्या अहमदाबाद कसोटीत विजय गरजेचा होता. पण हा सामना अनिर्णत राहिला किंवा भारत पराभूत झाला, तर मात्र भारताला आशा करावी लागणार होती की श्रीलंका न्यूझीलंडविरुद्ध 2-0 असा विजय मिळवणार नाही.

मात्र आता श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने अहमदाबाद कसोटीत कोणताही निकाल लागला, तरी भारताचे कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित झाला आहे.

भारत दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात

भारताने कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2021 मध्ये देखील भारताने पहिल्यांदा कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

आता कसोटी चॅम्पियनशीप 2021-2023 चा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील लंडनमध्ये असलेल्या द ओव्हल मैदानावर होणार आहे.

न्यूझीलंडचा विजय

या सामन्यात विजयासाठी न्यूझीलंडसमोर श्रीलंकेने 285 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला 257 धावांची गरद होती. पण शेवटच्या दिवशी सुरुवातीला पावसाचा बराचवेळ व्यत्यय आला, त्यामुळे सामना पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न उभा राहिला होता.

पण पाऊस थांबल्याने सामन्याला सुरुवात झाली. त्यानंतर न्यूझीलंडने आक्रमक फलंदाजी करत 70 षटकात 8 विकेट्स गमावत 285 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले. न्यूझीलंडकडून या डावात केन विलियम्सनने शतकी खेळी करताना 194 चेंडूत 121 धावा केल्या.

तसेच डॅरिल मिशेलने 81 धावांची खेळी केली. विलियम्सन आणि मिशेल यांच्यात चौथ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारीही झाली होती. त्यांच्या या भागीदारीमुळे न्यूझीलंडला विजय मिळवणे सोपे गेले.

या सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव 355 धावांवर संपला होता, तर न्यूझीलंडने पहिल्या डावात 273 धावा करत 18 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 302 धावा उभारत 285 धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

SCROLL FOR NEXT