India vs England X/ICC
क्रीडा

World Cup Points Table: जलवा हैं हमारा! टीम इंडिया विजयाचा सिक्सर लगावत 'अव्वल', तर गतविजेते गाळात

World Cup 2023 Points Table: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

Pranali Kodre

Team India Has Claimed the Top Spot on ICC World Cup 2023 Points Table After Win Against England:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 29 वा सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात झाला. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 100 धावांनी विजय मिळवला.

हा भारताचा या स्पर्धेतील सलग सहावा विजय होता. भारताने या स्पर्धेत आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व ६ सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच गतविजेत्या इंग्लंडने मात्र या स्पर्धेतील पाचवा पराभव पत्करला. इंग्लंडने सहापैकी केवळ एकच विजय मिळवला आहे.

त्यामुळे आता भारतीय संघाने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारताचे 6 विजयांसह 12 गुण आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच सामन्यांत विजय मिळवला असून एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे त्यांचे 10 गुण आहेत.

त्याचबरोबर गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आहेत. या दोन्ही संघांनी सहापैकी चार सामने जिंकले आहे, तर दोन पराभव स्विकारले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या फरकामुळे न्यूझीलंड तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहेत.

इंग्लंड मात्र शेवटच्या स्थानी

दरम्यान, इंग्लंडला या स्पर्धेतील पाचवा पराभव स्विकारावा लागल्याने ते 2 गुणांसह सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या वर 9 व्या क्रमांकावर बांगलादेश असून त्यांनाही पाच सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांचेही 2 गुण आहेत. पण बांगलादेशचा नेट रनरेट इंग्लंडपेक्षा चांगला असल्याने ते 9 व्या क्रमांकावर आहेत.

त्याचबरोबर पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर अनुक्रमे श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स आहेत. या चारही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी 2 विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रत्येकी 4 गुण आहेत.

मात्र, नेट रनरेटच्या फरकाने त्यांचे गुणतालिकेत स्थान ठरवण्यात आले आहेत. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचे आत्तापर्यंत पाचच सामने झाले आहेत, तर पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांचे सहा सामने झाले आहेत.

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात 30 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. यांच्यात विजय मिळवणारा संघ बाकी तीन संघांना मागे टाकत पाचवा क्रमांक मिळवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT