Team India Practice Dainik Gomantak
क्रीडा

Team India Practice Video: कॅच सुटणे आता कठीणच...! WTC फायनलसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरू

WTC Final: कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

Pranali Kodre

Team India Practice ahead of WTC Final: भारतीय क्रिकेट संघ कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 चा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला पोहचला आहे. भारत आणि ऑस्ट्रलिया संघात 7 ते 11 जून दरम्यान हा सामना रंगणार आहे. त्यामुळे केवळ 5 दिवसच उरलेल्या या स्पर्धेसाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

नुकताच भारतीय संघाच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू झेल घेण्याचा सराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप खेळाडूंना सुरुवातीला सरावाबाबत काही सुचना देत आहेत. त्यानंतर खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रात झेल घेण्याचा सराव करत आहेत. यामध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल असे भारतीय संघातील खेळाडू दिसून येत आहेत.

यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

नुकतीच आयपीएल 2023 स्पर्धा मंगळवारी मध्यरात्री (30 मे) संपली. त्यानंतर संपूर्ण भारतीय संघ इंग्लंडमधील लंडन शहरात एकत्र आला आहे. लंडनमधील द ओव्हल मैदानावर हा कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी 12 जून हा राखीव दिवस असणार आहे.

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची भारताची दुसरी वेळ आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

यापूर्वी 2019-21 दरम्यान कसोटी चॅम्पियनशीपचे पहिले पर्व खेळवण्यात आले होते, त्या पर्वातही भारताने अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.

आता, भारतीय संघ यंदा पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

    राखीव खेळाडू - यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव

  • ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT