Indian Women's Team Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022 मध्ये भारतीय महिला संघाची कमाल, सलग जिंकला तिसरा सामना

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये भारतीय महिला संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे.

दैनिक गोमन्तक

IND W vs UAE W, Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये भारतीय महिला संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने मंगळवारी महिला T20 आशिया चषक स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) 104 धावांनी पराभव केला. या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती, पण जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्माने टीमची धुरा सांभाळली आणि विजय मिळवून दिला. जेमिमा रॉड्रिग्सने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले.

टीम इंडियाचा सलग तिसरा विजय

UAE ने पहिल्या पाच षटकात 3 बाद 20 धावा करुन दमदार सुरुवात केली, त्यानंतर जेमिमा (45 चेंडूत नाबाद 75) आणि दीप्ती (49 चेंडूत 64) यांनी 13.3 षटकात 128 धावा करुन भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली. भारतीय वंशाच्या 11 खेळाडूंचा समावेश असलेल्या UAE संघाने हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. संघाला 20 षटकात 4 गडी गमावून 74 धावाच करता आल्या.

सेमीफायनल खेळण्याचे मोठे दावेदार

भारताने (India) लागोपाठ तीन सामने जिंकले असून उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. मात्र, संघाला अद्याप बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानविरुद्ध दोन मोठे सामने खेळायचे आहेत. स्मृती मंधाना, एस मेघना आणि फॉर्मात नसलेली शफाली वर्मा लवकर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर जेमिमा आणि दीप्ती यांनी भारतीय डाव 12 व्या षटकापर्यंत रोखून धरला. जेमिमाने आपल्या डावात 11 चौकार मारले तर दीप्तीने पाच चौकारासह दोन षटकार मारले.

शेवटच्या 6 षटकांमध्ये फलंदाजी केली

यूएईच्या कर्णधाराने आठ गोलंदाजांचा वापर केला. दुसरीकडे, भारतीय फलंदाजांनी शेवटच्या सहा षटकांत 72 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईच्या फलंदाजांची मानसिकता बचावात्मक होती. दुसऱ्या षटकात पाच धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर त्यांचे लक्ष विकेट वाचवण्यावर अधिक होते. कविशा एगोडागे (54 चेंडूत नाबाद 30) आणि खुशी शर्मा (50 चेंडूत 29) यांनी चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी रचली, परंतु यादरम्यान त्यांचे लक्ष्य केवळ विकेट वाचवणे हे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT