Asia Cup 2022 च्या फायनलनंतर सोशल मीडियावर मिस्ट्री गर्लची चर्चा, 'म्हणून मॅच पाहिली...'

Mystery Girl: आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 23 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
Mystery Girl
Mystery GirlDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2022: आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 23 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका मिस्ट्री गर्लची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी महिला चाहत्यांच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरु आहेत. एका चाहत्याने तर लिहिले की, 'अंतिम सामना पूर्ण पाहण्याचे हे एकमेव कारण आहे.' ही क्लिप त्यावेळची आहे, जेव्हा श्रीलंकेचा डाव सुरु होता. श्रीलंकेची त्यावेळी धावसंख्या 40 होती.

दरम्यान, या महिला चाहत्याची प्रतिक्रिया इतकी क्यूट होती की, तिची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड शेअर केली जात आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास तर श्रीलंकेने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानचा (Pakistan) फायनलमध्ये पराभूत केले. श्रीलंकेने (Sri Lanka) 58 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या, मात्र वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षे यांनी मिळून पुन्हा संघाला उभारी मिळवून दिली.

Mystery Girl
Asia cup 2022 जिंकणाऱ्या श्रीलंकेवर करोडों रूपयांची बरसात

दुसरीकडे, श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 170 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 20 षटकात 147 धावांवर ऑलआऊट झाला. वनिंदू हसरंगाला मालिकावीर, तर भानुका राजपक्षेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com