Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाने रचला इतिहास, अखेर 12 वर्षांनंतर केली 'ही' कामगिरी!

India vs Australia 1st ODI Match: टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला हरवून एकदिवसीय मालिकेला सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

India vs Australia 1st ODI Match: टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला हरवून एकदिवसीय मालिकेला सुरुवात केली आहे. टीम इंडियासाठी हा सामना खूप खास होता.

या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत होता, तर समोर ऑस्ट्रेलियन संघ होता, ज्याच्या विरोधात भारतीय संघ 12 वर्षांपासून एका खास क्षणाची वाट पाहत होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने 12 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा पराक्रम करुन दाखवला.

भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला

टीम इंडियाने (Team India) गेल्या 12 वर्षांपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही वनडे सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता, पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वानखेडेवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा पराक्रम करुन दाखवला.

गेल्या वेळी जेव्हा या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतीय वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन बळी घेत पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला 35.4 षटकात 188 धावांत गुंडाळले.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शने एकट्याने 65 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह 81 धावा केल्या. भारताकडून अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) दोन आणि कर्णधार हार्दिक पांड्या-चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात शार्दुल ठाकूर वगळता भारताकडून गोलंदाजी करणाऱ्या सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या.

केएल राहुलने मॅच विनिंग इनिंग खेळी खेळली

भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 35.4 षटकांत 188 धावांत गुंडाळला. याला प्रत्युत्तर म्हणून भारताची सुरुवातही खूपच खराब झाली आणि पाचव्या षटकातच मिचेल स्टार्कने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवला स्वस्तात पाठवले.

यानंतर मात्र राहुल (नाबाद 75) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 45) यांनी सहाव्या विकेटसाठी 108 धावांची शानदार भागीदारी करत संघाला 39.5 षटकांत 5 बाद 191 धावांपर्यंत नेले. जडेजाने गोलंदाजीतही दोन बळी घेतले. विशेष म्हणजे, तो सामनावीर म्हणून निवडला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT