Tamim Iqbal Dainik Gomantak
क्रीडा

Tamim Iqbal: बांगलादेशी कॅप्टनचा यू-टर्न, पंतप्रधानांच्या मध्यस्थीनंतर निवृत्तीतून घेतली माघार

Tamim Iqbal Retirement: बांगलादेशचा वनडे कर्णधार तमिम इक्बालने एका दिवसात त्याच्या निवृत्तीतून माघार घेतली आहे.

Pranali Kodre

Tamim Iqbal withdraws retirement : गुरुवारी बांगलादेशचा वनडे कर्णधार तमिम इक्बालने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पण आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्याने हा निर्णय मागे घेतला आहे.

तमिमने अफगाणिस्तानविरुद्ध सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ५ जुलै रोजी पराभव स्विकारावा लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी चितगाव येथे पत्रकार परिषदेत निवृत्ती घोषित केली होती.

पण आगामी आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असताना त्याने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. पण त्याच्या निवृत्तीनंतर लिटन दासकडे अफगाणिस्तानच्या उर्वरित वनडे मालिकेसाठी नेतृत्व दिले होते.

दरम्यान, तमिमने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याची शेख हसीना यांच्याबरोबरच माजी कर्णधार मश्रफे मोर्तझा आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नझमुल हसन यांच्याबरोबर शुक्रवारी दुपारी चर्चा झाली. त्यानंतर तमिमने त्याच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

तमिमने त्याची निवृत्ती मागे घेण्याबद्दल सांगितले की 'आदरणीय पंतप्रधानांनी दुपारी मला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते आमची चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी मला निवृत्तीतून माघार घेण्याची सूचना केली. आता मी माझी निवृत्ती मागे घेत आहे.'

'मी कोणालाही नाही म्हणू शकतो, पण देशातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला नाही म्हणणे अशक्य आहे. पापोन भाई (हसन) आणि मश्रफे भाई मोठे घटक होते. पंतप्रधानांनीही मला दीड महिन्याचा ब्रेक दिला आहे. मी माझे उपचार पूर्ण करून पुन्हा क्रिकेट खेळणार आहे.'

34 वर्षीय तमिमने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर तो बांगलादेशकडून अखेरचा कसोटी सामना एप्रिलमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळला आहे. तमिम बांगलादेशच्या उत्तर वनडे कर्णधारांपैकी एक मानला जातो.

त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने 37 वनडे सामन्यांपैकी 21 सामने जिंकले आहेत. त्याने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटीत नेतृत्वही केले होते.

तमिमने 241 वनडे सामन्यांत 14 शतके आणि 56 अर्धशतकांसह 36.62 च्या सरासरीने 8313 धावा केल्या आहेत. तो वनडेत बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT