IPL Captains Dainik Gomantak
क्रीडा

IPL in Theatres: आता थिएटरमध्ये पाहाता येणार क्रिकेट सामने? तमिळनाडू सरकारला साकडे

IPL in Theatres: 'थिएटरमध्ये क्रिकेट मॅचेसचे व्हावे स्क्रिनिंग', अशी विनंती तमिळनाडू सरकारकडे करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Tamil Nadu Film Exhibitors’ Association requested state government Provide permission to screening IPL cricket matches at theatres:

भारताला क्रिकेटवेडा देश म्हटले जाते. क्रिकेटसाठी जगात सर्वाधिक लोकप्रियता भारतात आहे, त्यामुळे लाखो क्रिकेट चाहते सामने पाहाण्यासाठी स्टेडियमवर जाण्यासाठी उत्सुक असतात. याच गोष्टी लक्षात घेता तमिळनाडू फिल्म एक्झिबिटर्स असोसिएशनने (TNFEA) राज्य सरकारकडे विनंती केली आहे की थिएटरमध्ये क्रिकेट सामन्यांसाठी स्क्रिन दिली जावी.

मंगळवारी TNFEA ने या संदर्भात ठरावांचा एक संचही मंजूर केला आहे. त्यांनी लोकप्रिय दिग्दर्शक आणि कलाकारांना वर्षातून किमान दोन चित्रपट प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे.

रिपोर्ट्सनुसार गेल्याच आठवड्यात थिएटर मालकांकडून सातत्याने आर्थिक नुकसानीच्या तक्रारी येत असल्याने TNFEA ने राज्य सरकारकडे सर्व थिएटरमधील तिकिटांच्या किमती वाढवण्याचे आवाहन केले होते.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मंगळावरी पत्रकारांशी बोलताना TNFEA अध्यक्ष रमेश बाबू यांनी सांगितले की 'आमची इच्छा आहे की व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी द्यावी. लोकांना आयपीएल सामन्यांसारखे कार्यक्रम मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असते. लवकरच वर्ल्डकप होणार आहे, त्यामुळे आम्ही सरकारकडे व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागत आहे.'

तसेच जर क्रिकेट सामन्यांच्या स्क्रिनिंगला परवानगी मिळाली, तरी सुरक्षेचा प्रश्न उभा राहिल का, असे विचारले असता, त्यांनी सांगितले, जर सरकार स्टेडियममध्ये सामना पाहाणाऱ्या 50,000 हून अधिक लोकांना सुरक्षा पुरवू शकते, तर 500 लोकांना सुरक्षा पुरवण्याची व्यवस्था करू शकते.

याशिवाय असोसिएशनने निर्मात्यांना अशीही विनंती केली आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आठ आठवडे उलटल्यानंतर प्रदर्शित केले जावेत.

दरम्यान, जर असोसिएशनने केलेल्या विनंतीनुसार जर खरंच क्रिकेट सामन्यांच्या स्क्रिनिंगला तमिळनाडू सरकारकडून परवानगी मिळाली, तर आगामी मोठ्या स्पर्धांचा विचार करता ही क्रिकेटविश्वात खूप मोठी गोष्ट ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT