MS Dhoni at inauguration of new stand at MA Chidambaram Stadium Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: चेन्नईच्या स्टेडियममधील नव्या स्टँडचं उद्घाटन, लाडक्या थालाचीही उपस्थिती, पाहा Video

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईत होणाऱ्या वनडेपूर्वी एमए चिदंबरम स्टेडियममधील नव्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी एमएस धोनीही उपस्थित होता.

Pranali Kodre

MS Dhoni at inauguration of new stand at MA Chidambaram Stadium: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेतील तिसरा सामना 22 मार्च रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी (17 मार्च) एमए चिदंबरम स्टेडियममधील नव्या पॅव्हेलियन स्टँडचे उद्घाटन करण्यात आले.

या नव्या स्टँडला तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या सन्मानार्थ 'कलैगनार एम करुणानिधी स्टँड' असे नाव देण्यात आले आहे. या स्टँडचे उद्घाटन तमिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यासाठी तमिळनाडूचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री उदयनीधी स्टॅलिन, आयसीसी आणि बीसीसीआयने माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी, माजी अष्टपैलू ड्वेन ब्रावो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सध्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ आगामी आयपीएल 2023 स्पर्धेची तयारी चेन्नईत करत असल्याने सीएसके संघातीन अनेक सदस्य देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

तीन वर्षांनी वनडे सामना

दरम्यान, एमए चिदंबरम स्टेडियमवर तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच 22 मार्च रोजी वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी अखेरचा वनडे सामना 15 डिसेंबर 2019 रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झाला होता.

सीएसके तीन वर्षांनी खेळणार चेन्नईत

चेन्नई सुपर किंग्स तब्बल 3 वर्षांनी घरच्या प्रेक्षकांसमोर सामने खेळण्यास सज्ज आहे. गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे सीएसकेला चेन्नईत सामने खेळता आले नव्हते. पण यंदा आयपीएलमध्ये प्रत्येक संघ आपापल्या घरच्या मैदानांवर घरचे सामने खेळणार असल्याने एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर सीएसकेचे सामने आयोजित केले जाणार आहेत.

चेन्नईमध्ये सीएसके यंदाच्या आयपीएलमधील साखळी फेरीतील सात सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना 3 एप्रिलला होणार असून हा सामना सीएसके विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.

सीएसकेचा संघ चेन्नईत

सध्या सीएसके संघाचा चेन्नईमध्ये कॅम्प लागला आहे. त्यासाठी सीएसकेच्या सपोर्ट स्टाफ सदस्यांसह कर्णधार एमएस धोनीबरोबर अनेक खेळाडू चेन्नईत दाखल झालेले आहेत. त्यांची आगामी आयपीएलसाठी तयारीही सुरु झाली आहे. दरम्यान, अशी चर्चा आहे की सीएसकेचा कर्णधार धोनी या आयपीएल हंगामात चेन्नईतील प्रेक्षकांसमोर खेळल्यानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT