MS Dhoni: 'त्यावेळी धोनी उठला, बोलला अन् इमोशनल झाला', वॉटसनने सांगितली CSK संघातील स्पेशल आठवण

शेन वॉटसनने नुकतीच एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील एक खास आठवण सांगितली आहे.
CSK | IPL
CSK | IPL Dainik Gomantak

Shane Watson Share emotional memory of MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामाच्या तयारीला चेन्नई सुपर किंग्स संघाने सुरुवातही केली आहे. सीएसके आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने 2010, 2011, 2018 आणि 2021 साली आयपीएलचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्वात जिंकले आहे.

दरम्यान, धोनी आणि सीएसकेसाठी 2018 चे विजेतेपद काहीसे वेगळे आणि भावनिक होते. कारण 2016 आणि 2017 या दोन वर्षांसाठी सीएसके आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर 2013 साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात समोर आलेल्या काही रिपोर्ट्समुळे बंदी घालण्यात आली होती.

CSK | IPL
MS Dhoni: CSK ने वाढवली फॅन्सची धडधड! 7 वाजून 29 मिनिटांनी शेअर केला कॅप्टनकूलचा 'तो' व्हिडिओ

या बंदीनंतर 2018 साली या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते. महत्त्वाचे म्हणजे सीएसकेने पुनरागमनाच्या हंगामात विजेतेपदालाही गवसणी घातली होती. त्यावेळी सीएसकेच्या संघात शेन वॉटसन आणि हरभजन सिंग हे देखील होते. त्यांच्यात नुकतेच या हंगामाबद्दल चर्चा झाली आहे.

सध्या हे दोघे कतारमध्ये सुरु असलेल्या लीजंड्स क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान एकत्र आले होते. त्यावेळी एका सामन्याच्या आधी झालेल्या मुलाखतीत या दोघांनी 2018 मधील सीएसकेच्या विजेतेपदाबद्दल संवाद साधला.

CSK | IPL
MS Dhoni: 'कॅप्टनकूल'चा सुपर फॅन! चक्क लग्नपत्रिकेवरच छापला लाडक्या माहीचा फोटो

वॉटसनने 2018 मध्ये संघाच्या पहिल्याच कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार वॉटसन म्हणाला, 'त्यावेळी एक क्षण होता, जेव्हा एमएस धोनी उठला आणि संघाच्या पहिल्या कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी तुम्ही त्याच्यासाठी सीएसके किती महत्त्वाची आहे, हे पाहू शक होता. तो त्यावेळी सीएसके संघ पुन्हा एकत्र आल्याबद्दल भावनिक झाला होता.'

वॉटसन पुढे म्हणाला, 'मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात ड्वेन ब्रावोने चांगला खेळ करत सामना जिंकून दिला. त्यानंतर संघात विश्वास निर्माण झाला. आपल्याकडे संघ होता, खेळाडू होते आणि आपण काही चांगली कामगिरी केली. धोनी आणि स्टिफन फ्लेमिंगने जे वातावरण निर्माण केले होते की मैदानात जा आणि आनंद घ्या. आपण कधीही निकालाबद्दल चर्चा केली नाही, फक्त मैदानात खेळाचा आनंद घेतला. आपल्याकडे चांगले खेळाडू होते. तसेच कुटुंबही बरोबर होते. माझ्यासाठी तो खूप विशेष कालावधी होता.'

दरम्यान, 2018 सालच्या आयपीएलमध्ये शेन वॉटसनने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद 117 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो या सामन्याचा सामनावीर देखील ठरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com