BAN vs IRE Test Taijul Islam Test World Record: बांगलादेश विरुद्ध आयर्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत विक्रमांची राळ उठली आहे. या पर्वात आणखी एक विश्वविक्रम झाला आहे. होय, हा विक्रम बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लाम (Taijul Islam World Record vs Ireland) च्या नावावर नोंदवला गेला आहे.
दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आयर्लंडचा खेळाडू पीटर मूरला बाद करुन तैजुलने (Taijul Islam Test Cricket World Record) कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम केला.
आयरिश खेळाडू पीटर मूर कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या संघांसाठी खेळला आहे. तैजुल कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या देशांकडून खेळणाऱ्या फलंदाजाची विकेट घेणारा कसोटी इतिहासातील एकमेव गोलंदाज ठरला.
खरे तर, हरारे येथे जन्मलेल्या पीटर मूरने आयर्लंडपूर्वी झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. (Peter Moor Played for Ire and Zim) 2018 मध्ये, जेव्हा झिम्बाब्वे (Zimbabwe) संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आला तेव्हा पीटर मूर त्याचा एक भाग होता.
बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध आयर्लंड सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर आयर्लंडने दुसऱ्या डावात 8 गडी गमावून 286 धावा करत 131 धावांची आघाडी घेतली आहे.
दुसरीकडे, पीटर मूरला पहिल्या डावात तैजुल इस्लामने आपला बळी बनवले आणि मूर केवळ 1 धावा काढून बाद झाला. तैजुल इस्लामने सामन्याच्या पहिल्या डावात (Taijul Islam Five Wicket Hall vs Ireland) 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या डावात आतापर्यंत आयर्लंडच्या 4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.