T20 World Cup: ICC's agreement with PVR for live match
T20 World Cup: ICC's agreement with PVR for live match Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: आता मल्टिप्लेक्समध्ये पाहता येणार सामने, ICC चा PVR सोबत करार

Abhijeet Pote

IPL नंतर आता जगभरातील क्रिकेट चाहत्यांना वेध लागलं आहे ते T -20 विश्वचषकाच . या 45 दिवसांच्या स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा अधिकच रंजक होणार आहे . या स्पर्धेचे आयोजन भारताने केले आहे जे ओमान आणि यूएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करत आहे. T -20 विश्वचषकादरम्यान चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता भारतातील चाहत्यांसाठीही सामने पाहण्यासाठी आता शक्य आहे कारण त्यांना आता मल्टीप्लेक्सच्या मोठ्या पडद्यावर सामन्याचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. (T20 World Cup: ICC's agreement with PVR for live match)

T 20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे IND vs PAK हा सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाणारा आहे . 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय भारताच्या गटात आणखी चार संघ आहेत. बाद फेरीपूर्वी भारताला सुपर 12 चे पाच सामने खेळावे लागतील.त्यात भारत 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध संघाचा पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी 18 आणि 20 ऑक्टोबर रोजी भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासोबत दोन सराव सामने खेळेल.

यावेळी विशेष गोष्ट म्हणजे आयसीसीने पीव्हीआर सिनेमाशी करार केला आहे, त्यानंतर भारतीय चाहते मल्टिप्लेक्समध्ये भारताचे सामने पाहू शकतील.

ICC ने केला PVR सोबत करार

देशातील मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमाजने शुक्रवारी सांगितले की, आयसीसीने T 20 विश्वचषक 2021 दरम्यान क्रिकेट सामन्यांचे थेट प्रदर्शन करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) बरोबर सर्व भारतीय सामन्यांच्या थेट प्रदर्शनासाठी करार केला आहे ज्यात सेमी फायनल, आयसीसी पुरुषांच्या T 20 विश्वचषक 2021 चा अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे. हे सामने नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह 35 हून अधिक शहरांमधील 75 हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जाणार आहेत.

देशात कोरोनामुळे बराच काळ बंद असलेली चित्रपटगृहे आता हळूहळू सुरू होत आहेत. हा निर्णय केवळ क्रिकेट चाहत्यांसाठीच नाही तर सिनेमा हॉलसाठी देखील खूप खास आहे जे बऱ्याच काळापासून त्रस्त आहेत. सध्या तेलंगणा, राजस्थान, कर्नाटकने 100 टक्के प्रेक्षक क्षमता असलेले चित्रपटगृह उघडले आहेत, तर मुंबईत 50 टक्के लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

Harmal Road : हरमल-चोपडे रस्‍ता धोकादायक; साकव अपूर्णावस्थेत

Actor Srikanth: अभिनेता श्रीकांत फॅमिलीसोबत गोव्यात करतोय सुट्ट्या एन्जॉय; फोटो व्हायरल!

Loksabha Voting Panaji : पणजीत मतदान कमी का झाले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनियोजित कामामुळे पणजीकर नाखुश

Sasashti News : ‘ख्रिश्‍चन’ विवाहासाठी वेळ वाढवा; चर्चिल यांची मागणी

SCROLL FOR NEXT