Uganda Vs Zimbabwe  Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2024: वनडेनंतर टी20 वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडला 'हा' संघ; युगांडाने क्लालिफाय होऊन रचला इतिहास

T20 World Cup 2024, Uganda Qualifies: जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी सर्व 20 संघ निश्चित झाले आहेत.

Manish Jadhav

T20 World Cup 2024, Uganda Qualifies: जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी सर्व 20 संघ निश्चित झाले आहेत. गुरुवारी, या स्पर्धेसाठी क्लालिफाय होऊन युगांडाने इतिहास रचला. एक संघ असा आहे जो पहिल्या वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. आता तो T20 विश्वचषक 2024 मधूनही बाहेर पडला आहे. युगांडाने गुरुवारी आफ्रिका क्लालिफाय स्पर्धेतील अंतिम सामन्यात रवांडाचा पराभव करुन पाचव्या विजयाची नोंद केली. यासह, आफ्रिकेचे क्लालिफाय असलेले नामिबिया आणि युगांडा हे दोन संघ निश्चित झाले.

दरम्यान, झिम्बाब्वे संघाने गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला (Pakistan) पराभूत करुन मोठा उलटफेर केला होता. मात्र या विश्वचषकासाठी संघ क्लालिफाय ठरु शकलेला नाही. यापूर्वी, एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करुनही झिम्बाब्वे पात्र ठरु शकला नाही.

या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून 20 संघांच्या या स्पर्धेत झिम्बाब्वेला स्थान न मिळणे हा मोठा धक्का आहे. ही स्पर्धा जूनमध्ये होणार असून 3 किंवा 4 जून रोजी सुरु होण्याच्या तारखेबाबत सस्पेन्स आहे. तर अंतिम सामना 30 जून रोजी होणार आहे.

कोणते 20 संघ पात्र ठरले?

दुसरीकडे, 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. काहींनी क्रमवारीच्या आधारे थेट प्रवेश मिळाला आहे तर काहींनी वेगवेगळ्या खंडांमध्ये खेळल्या गेलेल्या पात्रता स्पर्धांसह पात्रता मिळवली आहे.

यूएसए आणि वेस्ट इंडिजला यजमान म्हणून प्रवेश मिळाला. भारत (India), ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका 2022 च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले. क्रमवारीच्या आधारे अफगाणिस्तान आणि बांगलादेशला प्रवेश मिळाला.

यानंतर स्कॉटलंड आणि आयर्लंडने पुन्हा युरोप क्वालिफायरमधून पात्रता मिळवली. पापुआ न्यू गिनीने पूर्व आशिया पॅसिफिक क्वालिफायरमधून T20 विश्वचषक 2024 मध्ये स्थान मिळवले. अमेरिका क्वालिफायरमधून कॅनडा, नेपाळ आणि ओमान आशिया क्वालिफायरमधून पात्र ठरले.

आफ्रिका क्वालिफायरमधून नामिबिया आणि आता युगांडा यांनी प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत 20 संघ प्रत्येकी 5 च्या चार गटात विभागले जाणार आहेत. ग्रुप स्टेजनंतर, प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर 8 मध्ये जातील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामने खेळवले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT