T20 World Cup 2024 Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2024: 19 संघ पात्र, एका संघाची कशी होणार एन्ट्री? स्पर्धेचे स्वरुप काय असणार... जाणून घ्या

T20 World Cup 2024: एकदिवसीय विश्वचषक 2023 संपल्यानंतर, मोंमेटम आता T20 कडे शिफ्ट होत आहे.

Manish Jadhav

T20 World Cup 2024: एकदिवसीय विश्वचषक 2023 संपल्यानंतर, मोंमेटम आता T20 कडे शिफ्ट होत आहे. T20 विश्वचषक 2024 बद्दलही चर्चा आहे. कारण यावेळेसही T20 विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असा विचार करत असाल तर नाही.

आगामी विश्वचषक जूनमध्ये खेळवला जाणार आहे. त्याच्या तारखेबद्दल काही गोंधळ आहे पण तो 3 किंवा 4 जूनला सुरु होणार आहे. तर अंतिम सामना 30 जून रोजी होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा विश्वचषक अधिक खास असेल कारण यावेळी 10 किंवा 12 संघ नाही तर 20 संघ यात सहभागी होणार आहेत.

19 संघ पात्र ठरले

दरम्यान, 2024 च्‍या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत, परंतु त्‍यातील 19 संघ अद्याप निश्‍चित झाले आहेत. काही संघांना क्रमवारीच्या आधारे थेट प्रवेश मिळाला आहे तर काहींनी वेगवेगळ्या खंडांमध्ये खेळल्या गेलेल्या पात्रता स्पर्धांसह पात्रता मिळवली आहे.

यूएसए आणि वेस्ट इंडिजला यजमान म्हणून ऑटोमॅटिक प्रवेश मिळाला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान (Pakistan), दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका 2022 च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले. रँकिंगच्या आधारे अफगाणिस्तान आणि बांगलादेशला प्रवेश मिळाला.

संघ पात्र कसा होईल?

त्यानंतर स्कॉटलंड आणि आयर्लंड युरोप पात्रता फेरीतून पात्र ठरले. त्यानंतर, पापुआ न्यू गिनी पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता स्पर्धेतून पात्र ठरला. अमेरिका (America) क्वालिफायरमधून कॅनडा, नेपाळ आणि ओमान आशिया क्वालिफायरमधून पात्र ठरले. आफ्रिका क्वालिफायरमधून नामिबिया पात्र ठरला आहे. युगांडा, झिम्बाब्वे, केनिया आणि नायजेरिया पैकी एक संघ पात्र ठरेल. म्हणजे 19 निश्चित आहेत आणि आणखी एक संघ पात्र ठरेल.

या स्पर्धेचे स्वरुप काय असेल?

T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत 5-5 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच सुपर 8 मध्ये प्रवेश करतील.

यानंतर, बाद फेरी होईल आणि जे संघ आपापले सामने जिंकतील ते उपांत्य फेरीत जातील. त्यानंतर उपांत्य फेरीत पहिला सामना चौथ्या विरुद्ध आणि दुसरा तिसर्‍याविरुद्ध होईल. यानंतर 30 जून रोजी उपांत्य फेरीतील दोन विजयी संघ अंतिम सामना खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT