Rishabh Pant & Dinesh Karthik Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: पंत की कार्तिक! बांगलादेशविरुद्ध कोण खेळणार? द्रविडने हे दिले उत्तर

T20 World Cup 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना उद्यापासून अ‍ॅडलेड ओव्हलवर दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना उद्यापासून अ‍ॅडलेड ओव्हलवर दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. भारत सध्या 2 विजय आणि 1 पराभवासह 3 सामन्यांतून 4 गुणांसह गट 2 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे भारताचे 6 गुण होतील आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.

पंत आणि कार्तिक यांच्यात उद्याचा सामना कोण खेळणार?

T20 विश्वचषक 2022 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आज म्हणजेच मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविड यांना उद्या बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्यात दिनेश कार्तिक यष्टिरक्षक म्हणून खेळणार की ऋषभ पंत, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी आपल्या एका उत्तराने सर्वांनाच चकित केले.

या उत्तराने प्रशिक्षक द्रविड आश्चर्यचकित झाला

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी सांगितले की, 'अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फिटनेस पाहून त्याला बांगलादेशविरुद्ध टी-20 विश्वचषक 2022 मधील सामना खेळायचा आहे की नाही याचा अंतिम निर्णय उद्या घेतला जाईल. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा पाच विकेट्सनी पराभव झाला तेव्हा दिनेश कार्तिकला दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते.'

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती

दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित डावात ऋषभ पंतने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. द्रविड पुढे म्हणाले की, 'दुर्दैवाने, कार्तिकने बाउन्सर पकडण्यासाठी हवेत उडी मारली, पण नंतर तो चुकीच्या पद्धतीने जमिनीवर पडला आणि त्याला दुखापत झाली.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT