Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: सावधान टीम इंडिया! हे 4 खेळाडू जेतेपदापासून ठेऊ शकतात दूर

Team India: T20 वर्ल्ड कप 2022 च्या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Team For T20 World Cup 2022: T20 वर्ल्ड कप 2022 च्या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे. भारताकडे असे अनेक स्टार खेळाडू आहेत, जे भारताला ट्रॉफी जिंकून देऊ शकतात. त्याचबरोबर टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये चार खेळाडूंबाबत सावध रहावे लागणार आहे. हे खेळाडू भारतीय संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग करु शकतात. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

हा यष्टिरक्षक फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे

T20 क्रिकेटमध्‍ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज मोहमद रिझवान हा पाकिस्तानसाठी (Pakistan) सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तो या वर्षी T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि आशिया कप 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. भारतीय संघ त्याला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेल, कारण तो एक चांगला फलंदाज देखील आहे, जर तो क्रीजवर राहिला तर तो गोलंदाजांवर भारी पडू शकतो.

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा

श्रीलंकेचा (Sri Lanka) फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा याच्यापासून टीम इंडियाला सावध राहवं लागणार आहे. 2021 च्या विश्वचषकात तो आघाडीवर विकेट घेणारा गोलंदाज होता. विशेष म्हणजे, तो अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये येतो. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये तो एक यशस्वी खेळाडू देखील आहे. त्याची चार षटके टी-20 क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची ठरतात.

हा खेळाडू अडथळा ठरु शकतो

जोस बटलर (Jos Buttler) सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. तो डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करतो. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडसाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. विशेष म्हणजे, इंग्लंडचा (England) व्हाइट बॉलचा कर्णधार म्हणून बटलरची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्याने इंग्लंडकडून 94 टी-20 सामन्यांमध्ये 2312 धावा केल्या आहेत.

स्विंग गोलंदाजी

ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या नेहमीच वेगवान गोलंदाजांना साथ देतात. अशा परिस्थितीत जोस हेझलवूड तिथे कहर करु शकतो. त्यालाही देशांतर्गत परिस्थितीचा लाभ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT