Former Cricketer Rashid Latif Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय संघाची स्तुती करताना लतीफ ने पाकिस्तानी निवडकर्त्यांना सुनावले

भारतीय क्रिकेट संघ T२० विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेतील सर्वात संतुलित संघांपैकी एक असल्याचे लतीफचे मत

Dainik Gomantak

टी -20 विश्वचषक (T20 World Cup 2021) संघाबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) प्रश्न उपस्थित केले आहेत. लतिफने (Cricketer Rashid Latif) म्हटले आहे की, क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटसाठी निवडलेल्या पाकिस्तान संघात बदल करावा लागत असेल तर मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांनी राजीनामा देण्याचे गरज आहे. तर, लतीफने भारतीय संघाचे कौतुक करताना सांगितले की, भारतीय क्रिकेट संघ T२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वात संतुलित संघांपैकी एक आहे.

तो पुढे म्हणाला की, त्याच्या मते, पाकिस्तानी संघात अजूनही काही बदल होऊ शकतात. पाकिस्तानचा संघ अजूनही संतुलित वाटत नाही कारण संघात काही धक्कादायक नावे आहेत तर काही महत्वाची नावे नाहीत. t -20 विश्वचषक स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून ओमान-यूएईमध्ये खेळवली जाणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघ - भारतीय क्रिकेट संघ: लतीफ यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, "आता जर संघ निवडकर्ते 15 सदस्यीय संघात बदल करण्यासाठी पुढे गेले तर मुख्य निवडकर्त्यानी नैतिकतेने राजीनामा द्यावा. त्याचबरोबर इतर निवडकर्त्यांनीही पायउतार व्हावे. कारण ते संघनिवड करण्यासाठी जबाबदार व्यक्ती आहेत. आणि जर बदल केले गेले तर समजून जावे की ते संघाची निवड करण्यात अयशस्वी ठरलेत.

पाकिस्तानचा विश्वचषक संघ 15 ऑक्टोबर रोजी चार्टर्ड विमानाने दुबईला रवाना होईल. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय टी -20 चॅम्पियनशिपमध्ये काही निवडक खेळाडूंनी चांगला खेळ न केल्याने निवडकर्त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जेव्हा 15 सदस्यीय संघ आणि तीन राखीव खेळाडूंची घोषणा करण्यात आली, तेव्हा निवडकर्त्यांनी वरिष्ठ खेळाडू शोएब मलिक आणि सरफराज अहमद यांची निवड केली नाही. सलामीवीर फखर जमानचेही नाव राखीव खेळाडूंमध्ये नव्हते. यामुळे निवडकर्त्यांवर टीका करण्यात आली.

सरफराज अहमदची निवड न झाल्याने लतीफ संतापला

लतीफ म्हणाला की टी -20 सारख्या अनिश्चिततेचे स्वरूप असलेल्या क्रिकेट खेळात पाकिस्तान संघावर दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. या क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानी संघ काहीही करू शकतो. लतीफने माजी कर्णधार सर्फराजला युवा आझम खानचा राखीव कीपर-फलंदाज म्हणून केलेली निवड, तसेच जमान आणि वेगवान गोलंदाज शाहनवाज दानी यांची मुख्य संघातून हकालपट्टी केल्याबद्दल प्रश्न विचारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT