पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) पराभवानंतर टीम इंडिया (Team India) T20 world cup मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताला दोन्ही सामन्यांमध्ये मोठा संघर्ष करावा लागला मात्र भारत जिंकू शकला नाही,या दोन्ही पराभवानंतर टीम इंडियाची उपांत्य फेरीतुन बाद होण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियाला अंतिम 4 मध्ये टिकून राहण्यासाठी अफगाणिस्तानविरुद्ध (IndiaVsAfghanistan) मोठ्या विजयाची नितांत गरज आहे आणि म्हणूनच, टीम व्यवस्थापनाने आजच्या सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.(T20 WC: India may make changes in playing XI while playing against Afghanistan)
न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवानंतर, अनेक क्रिकेट पंडितांनी रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, अखेर संघ व्यवस्थापनाने आता अश्विनला खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. एका वृत्तानुसार, अश्विन अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार असल्याचे समजत आहे.
दरम्यान, दुखापतीमुळे इशान किशनच्या जागी आलेला सूर्यकुमार यादवही प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.विशेष म्हणजे, टीम इंडियाला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची कोणतीही संधी सोडणार नाही हेही स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान टीम इंडिया बुधवारी T20 वर्ल्ड कपमध्ये तिसरा सामना खेळणार आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. टीम इंडियाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने आठ विकेट्स राखून मात केली होती.दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. पहिल्या दोन सामन्यात भारतीय गोलंदाजांना केवळ 2 बळी घेता आले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुलची बॅट अजूनही शांत आहे. अफगाणिस्तानने तीन सामने खेळले असून दोन जिंकले आहेत, तर एक सामना पाकिस्तानविरुद्ध हरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.