Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC 2022: 'हा' खेळाडू T20 वर्ल्ड कपमध्ये जडेजाची कमतरता भरून काढेल, चहलचा दावा

रवींद्र जडेजा एक उत्तम गोलंदाज असण्यासोबतच एक उत्तम फलंदाजही आहे.

दैनिक गोमन्तक

2022 टी-20 विश्वचषक 16 ऑक्टबरपासून सुरू होत आहे. टीम इंडिया 14 खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पण क्रिकेटच्या या महाकुंभापूर्वी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले. पहिला स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला आणि नंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. दरम्यान, टीमचा सीनियर लेगस्पिनर युजवेंद्र चहलने मोठं वक्तव्य केलं आहे.

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) म्हणाला, रवींद्र जडेजा हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. तो एक उत्तम गोलंदाज असण्यासोबतच एक उत्तम फलंदाजही आहे. त्यांची जागा घेणे अवघड आहे. पण अक्षर पटेल त्यांची पोकळी भरून काढू शकतो. अक्षर पटेल 2022 च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाचा (Team India) एक भाग आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत चमकदार कामगिरी केली होती.

एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना चहल म्हणाला, "रवींद्र जडेजा हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि आता तो चांगली फलंदाजीही करत होता. या खेळात खेळाडूंना दुखापत होतच असते, पण अक्षर पटेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो. त्याला पर्याय मिळाला आहे. जडेजाची जागा कोणीही घेऊ शकत नाही, परंतु अक्षरने दाखवून दिले आहे की तो त्याची पोकळी भरून काढू शकतो.

टीम इंडियातील खेळाडु-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल , अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू-

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT