T20 World Cup: Virat Kohli reaction in press conference after INDvsPak match
T20 World Cup: Virat Kohli reaction in press conference after INDvsPak match  Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: पत्रकाराच्या प्रश्नावर विराटने लावला डोक्याला हात; पाहा Video

दैनिक गोमन्तक

विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय क्रिकेटचा पहिला कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्यांदाच विश्वचषकात (World Cup) पाकिस्तान विरुद्ध (INDvsPak) हार पत्करावी लागली आहे. देशाच्या क्रिकेटच्या इतिहासात 24 ऑक्टोबर 2021 पूर्वी विश्वचषकात पाकिस्तानकडून कोणताही कर्णधार हरला नव्हता.ICC T20 World Cup -2021 च्या सुपर-12 टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारताला हा पराभव पत्करावा लागला आहे. (T-20 World Cup: Virat Kohli reaction in press conference after INDvsPAk match)

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आहे या सामन्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या संघाने एकदिवसीय आणि टी -20 विश्वचषकात एकूण 12 वेळा आमनेसामने आले होते परंतु पाकिस्तानला विजय मिळवता आला नव्हता. टी -20 विश्वचषकात पाकिस्तानने आता आपले खाते उघडले आहे. हा पराभव टीम इंडियाला धक्का देणारा आहे.

या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक पत्रकार परिषद देखील घेतली मात्र या पत्रकार परिषदेत एक पत्रकार आणि विराट यांच्यात खटका उडालेला पाहायला मिळाला. या पत्रकाराने कोहलीला संघ निवडीबद्दल प्रश्न विचारला असता ज्यावर कोहली आधी चिडला आणि नंतर पत्रकाराने परत उलट प्रश्न विचारल्यावर हसायला लागला आणि विराटने चक्क डोक्याला हात लावला.

सामन्यांनंतर पत्रकार परिषदेत का पत्रकाराने कोहलीला प्रश्न विचारला की तो प्लेइंग-11 मध्ये रोहितच्या जागी इशान किशनला का नाही घेतलं यावर कोहलीने पत्रकाराचा खरपूस समाचार घेतला. कोहलीने आधी त्या पत्रकाराकडे टोमणे मारल्याच्या स्वरात पाहिलं आणि मग हसून उत्तर दिलं, "हा एक हुशार आणि धाडसी प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं सर? मला जो संघ सर्वोत्तम वाटला तोच मी खेळवला.तुम्हाला काय वाटत. तुम्ही रोहित शर्माला टी -20 आंतरराष्ट्रीय संघातून वगळले असते का? मागील सामन्यांमध्ये त्याने काय केले हे तुम्हाला माहिती आहे का?

या प्रश्नावर कोहली हसला आणि डोके धरून पत्रकाराला म्हणाला,यानंतर कोहली पुढच्या पत्रकाराचा प्रश्न ऐकू लागला, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतेच .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT