न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: हार्दिक पांड्या Is Back, नेटमध्ये गोलंदाजीसह केली फटकेबाजी

दुबईत झालेल्या सराव सत्रात पंड्याने (Hardik Pandya) 15 ते 20 मिनिटे गोलंदाजी केली आणि त्यानंतर तो फलंदाजीचा सराव करण्यासाही नेटमध्ये आला. आता त्याला पूर्वीसारखा कंबरेचा त्रासही होत नाही.

दैनिक गोमन्तक

टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघाची (Indian Team) सुरुवात खूपच खराब झाली होती. वर्ल्डकपमध्ये त्यांना पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभव केला. त्यानंतर भारतीय प्लेइंग इलेव्हनवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) संघातील स्थानाबाबत टीका केली होत आहे. वास्तविक पांड्या गोलंदाजीसाठी योग्य नव्हता, तरीही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान का देण्यात आले. असे अनेक प्रश्न सध्या विचारण्यात येत आहेत.

मात्र, आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. सरावात पांड्या आता गोलंदाजीही करत असल्याचे वृत्त आहे. हा अष्टपैलू खेळाडू आता मैदानात धमाका करणार असल्याचे खुद्द बीसीसीआयनेच म्हणले आहे. बीसीसीआयने गुरुवारी हार्दिक पांड्याचे काही फोटो पोस्ट केले ज्यामध्ये तो गोलंदाजी करत आहे. दुबईत झालेल्या सराव सत्रात पंड्याने पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी केली.

दुबईत झालेल्या सराव सत्रात पंड्याने 15 ते 20 मिनिटे गोलंदाजी केली आणि त्यानंतर तो फलंदाजीचा सराव करण्यासाही नेटमध्ये आला. हार्दिक पांड्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे की, या अष्टपैलू खेळाडूला आता पूर्वीसारखा कंबरेचा त्रास होत नाही.

यापूर्वी हार्दिक पांड्या गोलंदाजी करायचा तेव्हा त्याच्या पाठीला त्रास होत होता. त्यामुळे तो 23 सप्टेंबरला आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला नाही. पण आता पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

हार्दिक पांड्याने सराव सत्रात गोलंदाजीनंतर फलंदाजी करताना पुल शॉट्स खेळले आणि त्याला कंबरेमध्ये कोणतीही समस्या जाणवली नाही. त्यामुळे आता अशी अपेक्षा आहे की, हार्दिक पांड्याची बॅट न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तळपेल आणि त्याची गोलंदाजी देखील भारताला विजय मिळवून देण्यास फायदेशीर ठरेल अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT