फेसबुकनेही (Facebook) शमीविरोधात असभ्य शब्द वापरणाऱ्यांवर कारवाई केली Dainik Gomantak
क्रीडा

T-20 World Cup: शमीबाबत अक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्यांना फेसबुकचा दणका

भारतीय क्रिकेटपटूवर (Indian cricketers) केलेल्या चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स काढून टाकण्यासाठी त्यांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तानविरुद्धचा (Pakistan) दारुण पराभव झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा आणि राग आहे. त्यातूनच त्यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) आपल्या रागाचा शिकार बनवला आणि सोशल मीडियावर त्याला देशद्रोही, अशा शिव्या द्यायला सुरुवात केली. यानंतर भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) अनेक दिग्गज शमीच्या समर्थनार्थ पुढे आले आणि त्यांनी अशा भोंदूबाबांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता फेसबुकनेही (Facebook) शमीविरोधात असभ्य शब्द वापरणाऱ्यांवर कारवाई केली आणि त्यांच्या कमेंट डिलीट केल्या आहेत.

फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय क्रिकेटपटूवर केलेल्या चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स काढून टाकण्यासाठी त्यांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे. समाजात उपद्रव निर्माण करणाऱ्या आणि सामुदायिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार. आम्ही अलीकडेच छळ आणि गुंडगिरी यांसारख्या क्रियाकलापांवर नवीन धोरण देखील जारी केले आहे. त्या अंतर्गत लोकांचा डेटा सुरक्षित ठेवला जातो.

या सामन्यात शमी ठरला महागडा

पाकिस्तान विरुद्ध T20 सामन्यात भारताने 7 बाद 151 धावा केल्या होत्या, पण पाकिस्तानने 17.5 षटकात बिनबाद 152 धावा करत एकतर्फी विजय नोंदवला. यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चांगलाच महागात पडला. त्याने 3.5 षटकात 43 धावा दिल्या त्याबदल्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, टीम इंडियाचे बहुतांश गोलंदाज महागडे ठरले आणि कुणालाही विकेट मिळाली नाही. असे असतानाही शमीला लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले.

वीरेंद्र सेहवागही शमीच्या समर्थनार्थ पुढे आला. सेहवागने ट्विट केले की, मोहम्मद शमीवर झालेला ऑनलाइन हल्ला धक्कादायक असून आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. तो चॅम्पियन आहे आणि जो कोणी भारताची टोपी घालतो त्याच्या हृदयात भारतच असतो. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत, पुढच्या सामन्यात तू तुझा क्लास दाखवून देशील अशी आम्हाला खात्री आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT